पक्षांतर बंदी कायद्याला आता काही…; सत्तासंघर्षाच्या निकालानंतर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

पक्षांतर बंदी कायद्याला आता काही…; सत्तासंघर्षाच्या निकालानंतर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

संग्रहित छायाचित्र

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला आहे. १६ आमदार पात्र की अपात्र याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत. या निकालानंतर विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यामध्ये पहिली प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिली आहे. ते म्हणाले की, राजकीय पक्षातील बंडखोरीमुळे पक्षांतर बंदी कायद्याला आता काही अर्थ राहणार आहे की, नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे.

अजित पवार म्हणाले की, गेल्या वर्षी जुनमध्ये घटना घडली आणि त्याच्यानंतर बरीच राजकीय उलथापालथ झाली. अनेकांनी न्यायालयात धाव घेतली आणि सर्वोच्च न्यायालयात हा सर्व वाद सुरू होता. राज्याचं आणि देशाचं लक्ष लागून राहिलेल्या सत्तासंघर्षाच्या काल निकाल लागला. हा निकाल यायच्या आदल्यादिवशी मी लातूरच्या दौऱ्यावर होतो. त्यावेळेस मी माध्यमांना सांगितले होते की, हा 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे गेला पाहिजे आणि तशाच प्रकारे घडले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

खर तर दुरगामी परिणाम हे देशामध्ये अनेक ठिकाणी होणार आहेत. अशा प्रकारचे प्रंसग निर्माण झाल्यावर तेथील पक्ष न्यायालयाची पायरी चढतील आणि त्याच्यातून पुढच्या गोष्टी घडतील. पण पक्षांतर बंदी कायद्याला आता काय अर्थ राहणार आहे की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे. याच्या आधी स्थैर येण्याकरता बहुमत असल्यानंतर कुठली अडचण येत नव्हती आणि व्यवस्थितपणे सरकार चालत होते. पण या निर्णायामुळे या सगळ्याच गोष्टीला आता खिळ बसली का काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. पण त्याच्यामुळे सत्ताधारी असतील किंवा विरोधी असतील सगळ्याच राजकीय पक्षांनी संविधानाने आपल्याला ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्या सर्वांचा आदर करून अशा घटना उदया देशपातळीवर किंवा राज्यपातळीवर घडल्या तर, त्याच्यातून जनतेचा अपमान होणार नाही आणि स्थिरतापण लाभली पाहिजे, असे माझे स्पष्ट मत आहे, असे अजित पवार म्हणाले.

16 आमदार कमी झाले असते तरी सराकर टिकले असते
मी मागेही सांगत होतो की, यातला कोणताही निकाल लागला, काल जो निकाल दिला किंवा वेगळ्या पद्धतीचा निकाल असता तर सरकारवर काही परिणाण होणार नव्हता कारण त्यांच्याकडे बहुमत होते. त्यामुळे त्यांच्या बहुमतातले 16 आमदार कमी झाले तर राहिलेल्या संख्येमध्ये ते सरकार टिकले असते असे माझे मत होते, असेही अजित पवार यांनी सांगितले.

First Published on: May 12, 2023 10:44 AM
Exit mobile version