जाळं टाकलं माशासाठी, अडकला ९ फुटांचा अजगर!

जाळं टाकलं माशासाठी, अडकला ९ फुटांचा अजगर!

प्राणी संग्रहालयातील पिंजर्‍यातून अजगर आले बाहेर; पर्यटकांची उडाली घाबरगुंडी!

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सावंगा (गुरव) या गावातील बेंभाळा नदीमध्ये मासोळीच्या जाळ्यात अजगर असल्याची माहिती वन विभागाला फोन द्वारे मिळाली. त्यानुसार वन विभागाने वसा संस्थेच्या मदतीने अजगराला नदीच्या बाहेर काढले आहे. हा अजगर जखमी असल्यामुळे त्या अजगरावर सरकारी दवाखान्यात उपचार करण्यात आले. दरम्यान वसा रेस्क्यू सेंटरमध्ये योग्य काळजी घेतल्यानंतर त्या अजगराला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.

अशी करण्यात आली अजगराची सुटका

गावकऱ्यांच्या माहितीनुसार सदर अजगर दोन तीन दिवसा पासून मासोळी पकडण्याच्या जाळ्यात अडकला होता. अजगर नदीच्या मधोमध अडकलेल्या सस्थित होता. अनिमल्स रेस्क्युअर भूषण सायंके सर्व तयारीनिशी नदीत उतरले आणि मोठ्या शिफासतीने नऊ फुटी अजगराला जाळ्यासहित पाण्याच्या बाहेर काढले. त्यानंतर मासोळीच्या जाळ्याला कापून अजगराची सुटका करण्यात आली आहे. दोन ते तीन दिवसापासून जाळ्यात अडकला असल्यामुळे अजगर जखमी झाला होता. त्यानुसार वन विभाग यांच्या परवानगीने सदर जखमी अजगराची जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अमरावती येथे डॉ. विजय हटकर आणि डॉ. अनिल कळमकर यांनी अजगराचा उपचार केले. त्यानंतर अजगराला पुढील उपचाराकरतावसा रेस्क्यू सेंटरला दाखल करण्यात आले. पुन्हा या अजगराची वैद्यकीय तपासणी करून पंचनाम्या नंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले असल्याची माहिती अनिमल्स रेस्क्युअर भूषण सायंके आणि वन कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

First Published on: April 13, 2019 9:26 PM
Exit mobile version