भाजपाकडून राधाकृष्ण विखे-पाटलांनी घेतली मंत्रिपदाची पहिली शपथ, राजकीय कारकीर्द काय?

भाजपाकडून राधाकृष्ण विखे-पाटलांनी घेतली मंत्रिपदाची पहिली शपथ, राजकीय कारकीर्द काय?

गेल्या महिन्यापासून रखडलेला शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होत आहे. तब्बल 39 दिवसानंतर सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळाला आहे. यामध्ये शिंदे गट आणि भाजप असे एकूण 18 मंत्र्यांचा समावेश आहे. हा मंत्रिमंडळाचा विस्तार राज्यपालांच्या राजदरबारी होत आहे. यामध्ये सर्वात पहिले भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार यांनी शपथ घेतली आहे. यामध्ये भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी 9 मंत्र्यांचा समावेश आहे. तसेच यामध्ये पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात अपक्ष आमदार आणि विधान परिषदेच्या आमदारांनी संधी देण्यात आलेली नाही.

विखे-पाटलांची राजकीय कारकीर्द काय?

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा जन्म 15 जून 1959 मध्ये झाला. सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्यात जन्मलेल्या राधाकृष्ण विखे यांना लहानपणापासूनच समाजकारणाचं बाळकडू मिळालं होतं. त्यांचे आजोबा विठ्ठलराव विखे-पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे राज्यातील पहिले पब्लिक स्कूल प्रवरानगरला सुरू केले. याच पब्लिक स्कूलमध्ये राधाकृष्ण विखे यांना पहिलीत प्रवेश देण्यात आला.

विखेपाटलांनी अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर ते कृषीमंत्री झाले होते. नगरमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात यांचा संघर्ष सर्वश्रृत आहे. नगरवर पकड ठेवण्यासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये कायम चुरस राहिली आहे.

विखेपाटलांनी काँग्रेसमधून राजकारणास सुरूवात केली. 1986 मध्ये ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. 2009 पासून ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. राजीनामा देण्याआधी ते काँग्रेसचे विधानसभेतील विरोधीपक्ष नेते होते. अहमदनगरमधील प्रवरा शिक्षण प्रसारक संस्थेचे ते प्रमुख आहेत. 2019मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

शिंदे सरकारच्या मंत्रिमडळातील आमदार – 


हेही वाचा : Live Update : भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार यांनी शपथ


 

First Published on: August 9, 2022 11:42 AM
Exit mobile version