Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Live Update : राज्यात कोरोनाचे 1,782 नवे रुग्ण, सात कोरोनाबाधितांचा मृत्यू

Live Update : राज्यात कोरोनाचे 1,782 नवे रुग्ण, सात कोरोनाबाधितांचा मृत्यू

Subscribe

राज्यात कोरोनाचे 1,782 नवे रुग्ण, सात कोरोनाबाधितांचा मृत्यू

राज्यात गेल्या २४ तासांमध्ये राज्यात १,७८२ नवे कोरोना बाधित सापडले आहेत. तर, सात कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात एकूण १८५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
सध्या राज्यात ११ हजार ८८९ रुग्ण सक्रीय आहेत. तर, मुंबईमध्ये सर्वाधिक ३१२७ सक्रीय रुग्ण आहेत. पुण्यात २६७२ सक्रीय रुग्ण असून ठाण्यात ११२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


- Advertisement -

बिहारमध्ये सरकार कोसळलं, नितीश कुमारांनी दिला राजीनामा

नितीश कुमार राजभवनात दाखल


 • छोटेखानी विस्तार झाला, लवकरच पुन्हा विस्तार होणार – उपमुख्यमंत्री
 • जेलमध्ये असतील आणि अनेक नेत्यांवर खटले चालू असतील अशा पक्षाला यादी टाकण्याचा नैतिक अधिकार नाही
 • संजय राठोडबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे
 • मंत्रिमंडळात सक्षम मंत्री घेतलेले आहेत. ज्यांनी टोला लगावला त्यांनी आधी आरसा पाहाव
 • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात दाखल

- Advertisement -

नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने भाजपशी युती तोडत असल्याची अधिकृत घोषणा

लालू यांच्या राजद बरोबर युती करणार असल्याची पाटण्यात घोषणा

JDU आणि RJD यांचे नवे सरकार स्थापन करणार

JDU ची NDA मधून बाहेर पडत असल्याची घोषणा

नितीशकुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता


काही नावे टाळता आली असती, तर बरे झाले असते – अजित पवार


शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांनी मंत्रीपद दिल्याने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा संताप

पुजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिले जाणे हे अत्यंत दुदैवी आहे

संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे

माझा न्याय देवतेवर विश्वास

लडेंगे….जितेंगे


राज्यातील शिंदे सरकारचा शपथविधी सोहळा पार


भाजपाकडून मंगलप्रभात लोढा यांनी घेतली शपथ

१९९५ पासून सलग सहा वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत.

बिल्डर म्हणूनही त्यांची ओळख आहे.


शिंदे गटाकडून शंभूराज देसाई यांनी घेतली शपथ

राज्यमंत्रीपदी असलेले शंभूराज देसाई यांची कॅबिनेटपदी बडती

२००४, २०१४ आणि २०१९ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले.

गृह, वित्त व नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री म्हणून त्यांनी याआधी काम केलं आहे.


भाजपाकडून अतुल सावे यांनी घेतली शपथ

२०१४ पासून आमदार आहेत.

याआधी अनेक खाती सांभाळली आहेत.


शिंदे गटाकडून दीपक केसरकर यांनी घेतली शपथ

राज्यमंत्रीपदी असलेले दीपक केसरकर यांची कॅबिनेटपदी बडती

शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा राजकीय प्रवास करणारे दीपक केसरकर यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

सध्या त्यांच्यावर शिंदे गटाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी आहे.


शिंदे गटाकडून अब्दुल सत्तार यांनी घेतली शपथ

राज्यमंत्रीपदी असलेले अब्दुल सत्तार यांची कॅबिनेटपदी बडती

अब्दुल सत्तार २००९ पासून सलग तीन वेळा आमदार राहिले आहेत.

ठाकरे सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते.

टीईटी घोटाळ्यामुळे अब्दुल सत्तार गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत असून या पार्श्वभूमीवर त्यांचा पत्ता कट केला जाईल असं बोललं जात होतं.


भाजपाकडून रवींद्र चव्हाण यांनी शपथ घेतली

फडणवीस यांच्या काळात राज्यमंत्रीपदी असलेले रवींद्र चव्हाण यांची कॅबिनेटपदी बडती

२००९ पासून ते आमदार आहेत.

कल्याण-डोंबिवलीचे नगरसेवक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

त्यांच्याकडे अनेक खाती सांभाळण्याचा अनुभव आहे.


शिंदे गटाकडून तानाजी सावंत यांनी घेतली शपथ

फडणवीस सरकारमध्ये ते जलसंधारण मंत्री होते.

२०१९ मध्ये मंत्रीपदाची संधी हुकल्यानं ते नाराज होते.


शिंदे गटाकडून उदय सामंत यांनी घेतली शपथ

राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली होती.

२०१४ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

यानंतर आता ते शिंदे गटाच्या पाठीशी आहेत.

गेल्या सरकारमध्ये त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून काम पाहिलं आहे.


शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांनी शपथ घेतली

सलग पाचवेळा आमदार राहिले आहेत.

रोजगार हमी व फलसंवर्धन मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे.


भाजपाकडून सुरेश खाडे यांनी शपथ घेतली

सामाजिक न्यायमंत्री म्हणून त्यांना मंत्रीपदाचा अनुभव आहे.

२००४ पासून सलग चारवेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत.


शिंदे गटाकडून संजय राठोड यांनी शपथ घेतली

तरुणीच्या मृत्यूनंतर वादात अडकल्याने त्यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

भाजपाने त्यांच्याविरोधात मोठं आंदोलन केलं होतं.

संजय राठोड यांचा समावेश केल्याने भाजपामधील काही नेते नाराज असल्याची चर्चा आहे.


शिंदे गटाकडून दादा भुसे यांनी शपथ घेतली

२००४ पासून सलग आमदार असणाऱ्या दादा भुसे यांना कृषी खात्याचा अनुभव आहे.


शिंदे गटाकडून सर्वप्रथम गुलाबराव पाटील यांनी शपथ घेतली

मागील सरकारमध्ये त्यांच्याकडे सहकार राज्यमंत्री आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रीपदाची जबाबदारी होती.

एकनाथ शिंदेंना सर्वात प्रथम पाठिंबा देणाऱ्यांमध्ये गुलाबराव पाटील होते.


भाजपाकडून गिरिष महाजन यांनी शपथ घेतली

गिरीश महाजन सलग सहा वेळा आमदार राहिले आहेत.

शिवसेना-भाजपा युती सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणून काम केले आहे.

त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात बंदूक दाखवल्याने वाद निर्माण झाला होता.


भाजपाकडून विजयकुमार गावित यांनी शपथ घेतली


भाजपाकडून चंद्रकांत पाटील यांनी शपथ घेतली

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सहकार, पणन, महसूल, कृषी अशी अनेक खाती सांभाळली आहे.


भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार यांनी शपथ घेतली

सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री, वनमंत्री अशी खाती याआधी सांभाळली आहेत.


भाजपाकडून राधाकृष्ण विखे पाटील यांनी शपथ घेतली

राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वात प्रथम शपथ घेतली. भाजपाकडून सर्वात प्रथम राधाकृष्ण विखे पाटील यांनी फोन करुन मंत्रिमंडळात स्थान दिल्याचs सांगण्यात आलं होतं. यानिमित्ताने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अनुभवी नेत्याचा समावेश झाला आहे.


शपथविधीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दाखल

आघाडी सरकारमधील अब्दूल सत्तार आणि शंभुराज देसाई यांना कॅबिनेटपदी बडती

विधान परिषदेतून एकही सदस्या कॅबिनेट मंत्रिमडळ विस्तारात घेतलेला नाही


शपथविधीची 11 ची वेळ असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अद्याप पोहोचले नाही

थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार


18 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये दाखल


शिंदे-सरकारच्या शपथविधीला विरोधी पक्षनेते अजित पवार दाखल

शिंदे-सरकारच्या शपथविधीला केंद्रीय मंत्री रामदास आठवले

शिंदे-सरकारच्या शपथविधीला विरोधी पक्षनेते अजित पवार दाखल

शिंदे-सरकारच्या शपथविधीला केंद्रीय मंत्री कपिल पाटील

शिंदे-सरकारच्या शपथविधीला विरोधी पक्षनेते रावसाहेब दानवे दाखल

शिंदे-सरकारच्या शपथविधीला केंद्रीय मंत्री विनोद तावडे दाखल

शपथविधीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल


शिंदे सरकारच्या मंत्रिमडळातील आमदारांची नावे जाहीर

 • दादा भुसे
 • संदिपान भुमरे
 • चंद्रकांत पाटील
 • उदय सामंत
 • सुरेश खाडे
 • राधाकृष्ण विखे पाटील
 • रवींद्र चव्हाण
 • तानाजी सावंत
 • दीपक केसरकर
 • अब्दुल सत्तार
 • शंभूराज देसाई
 • गुलाबराव पाटील
 • सुधीर मुनगंटीवार
 • विजयकुमार गावित
 • संजय राठोड
 • अतुल सावे
 • मंगलप्रभात लोढा
 • गिरीश महाजन

ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

आपल्या गिरगाव येथील निवासस्थानी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला


अंधेरी सब-वे वाहतुकीसाठी बंद


मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू


शपथविधी सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर


राजभवनात शपथविधी सोहळा होणार


मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी

मुसळधार पावसामुळे मुंबईच्या सखल भागात साचले पाणी

- Advertisment -