राहुल गांधींनी बाळासाहेबांच्या स्मारकाला कधी अभिवादन केलं का? राणेंचा सवाल

राहुल गांधींनी बाळासाहेबांच्या स्मारकाला कधी अभिवादन केलं का? राणेंचा सवाल

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी मातोश्रीवर येणार आहेत. सावरकरांच्या मुद्यावरुन डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राहुल गांधी मातोश्रीवर येत आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, उद्धव ठाकरे व राहुल गांधी यांच्या भेटीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी सवाल उपस्थित केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला कधी अभिवादन केले का? असा सवाल नितेश राणे उपस्थित केला आहे. (Rahul Gandhi Has Visited Balasaheb Thackeray Memorial At Shivaji Park Even Once During The MVA govt Question Of Nitesh Rane)

भाजपा नेते नितेश राणे यांनी ट्विटरवरून राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर सवाल उपस्थित केला आहे. “राहुल गांधी मातोश्रीवर येणार आहेत. पण राहुल गांधी यांना सांगा की, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि स्मृतीदिनानिमित्त ट्वीट तरी करा”, असे नितेश राणे यांनी म्हटले.

याशिवाय, महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला कधी अभिवादन केले का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, सत्तेतले आणि सत्तेबाहेरचे अनेक दिग्गज नेते मातोश्रीवर येऊन गेले आहेत. दिल्ली आणि पंजाबचे आपचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि भगवंत मान हे मातोश्रीवर आले होते. या भेटीने देशातला विरोधी पक्ष एकवटत असल्याचा संदेश भाजपला देण्यात आला. त्यात आता राहुल गांधीची मातोश्रीवरची एन्ट्री उद्धव ठाकरेंसाठी फायद्याची ठरतेय का तोट्याची हे निवडणुकीत स्पष्ट होईल.


हेही वाचा – सरकारविरोधातील मोर्चात मृत्यू झालेल्याच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री शिंदेंकडून आर्थिक मदत

First Published on: April 14, 2023 4:17 PM
Exit mobile version