रायगडावर पर्यटकांना ७ डिसेंबरपर्यंत प्रवेशबंदी, राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे पोलिसांचे आदेश

रायगडावर पर्यटकांना ७ डिसेंबरपर्यंत प्रवेशबंदी, राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे पोलिसांचे आदेश

Raigad Fort : रायगड किल्ल्यावरील वीज यंत्रणेचे नूतनीकरण

रायगड पर्यटकांसाठी ७ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून ७ डिसेंबर रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत. यामुळे सुरक्षेच्या कारणामुळे रायगड ३ डिसेंबरपासून पर्यटकांना बंद ठेवण्यात आला आहे. रायगड ७ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती रायगड-अलिबाग पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

रायगड किल्ला आणि रोप-वे पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. ३ डिसेंबरपासून रायगडवर पर्यटकांना प्रवेशबंदी असणार आहे. तसेच रायगडच्या दिशेने जाणारा माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचड रस्ता, नातेगाव ते पाचड मार्गही बंद करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा रस्ता आणि रायगडावर प्रवेशबंदी केली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांकूडन दौऱ्याच्या दोन दिवसआधीच माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षा यंत्रणा आणि पोलीसांनी माहिती जारी केली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद महाराष्ट्रात येणार असून ते रायगड दौरा करणार आहेत. भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना रायगडला भेट देण्याचे आमंत्रण दिलं होते. राष्ट्रपतींनी भेटीच्या आमंत्रणाला प्रतिसाद दिलं असून ७ डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडाला भेट देणार असल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत दिली आहे. राष्ट्रपती महाराष्ट्र दौरा करुन रायगडला भेट देणार ही सर्वांसाठी गौरवास्पद बाब आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिलेली रायगडला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम ५ जानेवारी २०१४ रोजी रायगडला भेट दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. यावेळी महानगड ते रायगड अशी मोहिम शिव प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी ४ जानेवारीला रायगडवर पर्यटकांना प्रवेशबंदी केली होती. तसेच रायगडची सुरक्षा गुजरात पोलीस करत होते. गुजरात पोलिसांच्या आदेशानंतर संबंधित व्यक्तीला गडावर सोडण्यात येत होते.


हेही वाचा :  काँग्रेसला बाजूला करुन कोणताही पर्याय देणार नाही – शरद पवार


 

First Published on: December 1, 2021 5:33 PM
Exit mobile version