घरदेश-विदेशकाँग्रेसला बाजूला करुन कोणताही पर्याय देणार नाही - शरद पवार

काँग्रेसला बाजूला करुन कोणताही पर्याय देणार नाही – शरद पवार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सिल्वर ओकवर भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली. या भेटीवर बऱ्याच चर्चा सुरु होता. काँग्रेस व्यतिरिक्त वेगळा पर्याय देण्यासंदर्भात बैठका सुरु असल्याचं बोललं जात होतं. मात्र, शरद पवार यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना काँग्रेसला बाजूला करुन कोणताही पर्याय देणार नाही, असं स्पष्ट केलं.

ममता बॅनर्जी इथे येण्याच्या पाठीमागे साहजीकच बंगाल आणि महाराष्ट्राचं जुनं नातं आहे. दोन्हा राज्यांमध्ये बऱ्याच गोष्टी साम्य आहेत. त्यांना मला भेटायचं होतं, उद्धव ठाकरे यांना पण भेटायचं होतं. पण उद्धव ठाकरे रुग्णालयात आहेत त्यामुळे
संजय राऊत आणि आदित्य ठाकरे भेटले. आज मी माझे सहकारी बराच वेळ त्यांच्याशी चर्चा केली. सध्याची परिस्थिती, राष्ट्रीय सत्रावरच्या चर्चा केल्या. भाजपला राष्ट्रीय पातळीवर पर्याय देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. काँग्रेसला बाजूला करुन कोणताही पर्याय देणार नाही. तसंच, कोण नेतृत्तव करेल हा दुसरा मुद्दा असं शरद पवार यांनी सांगितलं. तसंच, नेता रस्त्यावर राहिला तरच विजय होतो हे ममतांचं म्हणणं अगदी योग्य असल्याचं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

UPA सध्या अस्तित्त्वात नाही – ममता बॅनर्जी

जे रस्त्यावर लढतील त्यांना सोबत घेऊन जाणार. देशातील सध्याची परिस्थिती पाहता चांगला विरोधी पर्याय तयार व्हायला हवा. हा पर्याय तयार करत असताना जे रस्त्यावर लढतील त्यांना आम्ही सोबत घेऊन जाणार. युपीए सध्या अस्तित्त्वात नाही, अशी भूमिका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केली आहे. एकप्रकारे युपीए व्यतिरिक्त आपण वेगळा विचार करतोय, असे स्पष्ट संकेत ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत. ममता बॅनर्जी यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओकवर भेट घेतली.

शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्यात तासभर चर्चा केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज जी देशात परिस्थिती आहे, हुकुमशाही देशात सुरु आहे. याविरोधात चांगला विरोधी गट तयार केला पाहिजे. एकटा कोणी करु शकत नाही. यासाठी शरद पवारांची भेट घेतली. एक मजबूत विरोधक हवा आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसचं नाव घेता टीपणी केली. जे लढत नाहीत, त्याला आम्ही काय करणार? सर्वांनी जमीनीवर लढायला हवं. काय आहे युपीए? आता युपीए नाही आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -