Oxygen Express साठी रेल्वेने कसली कंबर, कोरोना बाधितांच्या मदतीला धावणार रेल्वेच्या विशेष फेर्‍या

Oxygen Express साठी रेल्वेने कसली कंबर, कोरोना बाधितांच्या मदतीला धावणार रेल्वेच्या विशेष फेर्‍या

Oxygen Express साठी रेल्वेने कसली कंबर, कोरोना बाधितांच्या मदतीला धावणार रेल्वेच्या विशेष फेर्‍या

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या दुपटीने वाढतेय. यातच अनेक कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्याप्रमाणात गरज भासतेय. परंतु ऑक्सिजनच्या पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासतेय. यात आता कोरोना बाधित रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी भारतीय रेल्वे धावून आली आहे. राज्यातील ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने Oxygen Express सुरु करण्यासाठी कंबर कसली आहे.

भारतीय रेल्वेने आज लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) आणि ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक करण्यासाठी रेल्वे प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे जाहीर केले असून Oxygen Express एक्सप्रेस चालविण्यासाठी ग्रीन कॉरिडोर तयार करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राज्यातील ऑक्सिजन पुरवठा पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे मदत करणार आहे.

राज्यातील ऑक्सिजनची कमतरता दुर करण्यासाठी रेल्वे प्रशासन रिक्त ऑक्सिजन सिलेंडर मुंबईजवळील कळंबोली, बोईसर रेल्वे स्थानकातून घेणार असून यात ऑक्सिजन साठा पून्हा भरुन आणण्यासाठी विजाग, जमशेदपूर, राउरकेला, बोकारो येथे पाठविले जाणार आहे. अशाप्रकारे महाराष्ट्राला आता रेल्वे मार्गाने लवकरचं ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध होणार आहे.

रेल्वे प्रशासनाकडूनही लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलेंडरची वाहतुक करण्यासाठी योग्यती तयारी केली जात आहे. कोरोनाबाधित गंभीर रुग्णांना मोठ्याप्रमाणात ऑक्सिजनची गरज भासते. परंतु महाराष्ट्रासह मध्यप्रदेश राज्यात ऑक्सिजनाचा तुटवडा जाणवत असल्याने या राज्यांनी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) टँकर रेल्वेने मिळू शकेल का यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्रालयाला पत्र लिहिले होते. या पत्राला रेल्वे प्रशासनाने ग्रीन सिग्नल दिल्याने या दोन्ही राज्यातील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या वाहतुकीचे धोरण तयार करताना रेल्वे मंत्रालयाने रोल-ऑन-रोल ऑफ योजनेंतर्गत वाहतुकीस मान्यता दिली आहे. ऑक्सिजनच्या वाहतुकीस राज्यभरातील विविध ठिकाणी जाण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान रेल्वे मार्गाने जाणाऱ्या लिक्विड ऑक्सिजन ट्रकसोबत असलेल्या कर्मचार्‍यांना प्रवासासाठी सेकंड क्लासचे तिकीट आकारले जाईल आणि ट्रक सोबत केवळ दोन लोकांना परवानगी दिली जाईल. कंटेनरच्या रिक्त प्रवासासाठी रेल्वेकडून शुल्क देखील आकारले जाईल. याव्यतिरिक्त, लोडिंग आणि अनलोडिंगच्या वेळी ट्रकांना पाच तासांचा विनामूल्य वेळ दिला जाईल.

दरम्यान ऑक्सिजनच्या रेल्वे वाहतूकीनंतर सुनिश्चित स्थळी पोहचवण्यासाठी रस्ते वाहतूकीवरही विचार करण्यात आला आहे. यासाठी १७ एप्रिल रोजी रेल्वे बोर्डाचे अधिकारी आणि राज्य परिवहन आयुक्त आणि उद्योग प्रतिनिधी यांच्यात “लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या वाहतुकीशी संबंधित मुद्दे” या विषयावर बैठक झाली.

याबैठकीत राज्य सरकाराच ऑक्सिजन पुरवठ्यासाठी रिक्त टॅंकर पुरवणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले. त्यानंतर हे रिक्त टँकर लिक्विड मेडिकल ऑक्सिजन भरुन आणण्यासाठी मुंबई आणि त्याजवळील कळंबोली, बोईसर स्थानकांवर जमा केले जाणार असून विजाग, जमशेदपूर, राउरकेला, बोकारो येथे पाठवले जाणार आहेत. दरम्यान या टँकरसाठी विजाप, अंगुल आणि भिलाई येथे रॅम्प तयार केले जाणार आहेत. तर कळंबोली येथील रॅम्प अधिक वाढवण्यात येतील. तसेच कंळबोली स्थानकातून टँकर गेल्यानंतर या ठिकाणी पून्हा पोहचेपर्यंत काही ठिकाणी रॅम्प्सही तयार केले जाणार आहेत. यासाठी कंळबोली स्थानकाचीही विचार सुरु आहे. तसेच आणखी कोणत्या जागा उपलब्ध असल्यास राज्य सरकारने कळवावे असेही रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.


 

First Published on: April 18, 2021 6:38 PM
Exit mobile version