कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपले, रौद्ररुप धारण केल्याने अनेक ठिकाणी वित्तहानी

कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपले, रौद्ररुप धारण केल्याने अनेक ठिकाणी वित्तहानी

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज सायंकाळी झालेल्या पावसाने अक्षरशा झोडपून काढले. या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची छप्पर उद्ध्वस्त झाली, तर पत्र्याचे शेड उद्ध्वस्त झाले. शहरातील खानविलकर पंपानजीक झाड कोसळे तर राजारामपुरी परिसरात पावसामुळे झाड कोसळले.

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाने रौद्ररुप धारण केल्याने अनेक ठिकाणी वित्तहानीच्या घटना घडल्या असून पावसामुळे अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प झाली. तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाले उन्मळून पडली आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाहनांवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. तब्बल अर्ध्या तासानंतर पावसाचा जोर कमी झाल्याने दिलासा मिळाला. मात्र या पावसात अनेक घरांची छप्परे उडून गेली.

महापुराची टांगती तलवार –

कोल्हापूर जिल्हा गेल्या तीन वर्षांपासून सलग महापूरायतो आहे. यावर्षीही महापुराची टांगती तलवार जिल्ह्यावर आहे. हवामान खात्याने दिलेल्या दुसऱ्या अंदाजानुसार जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत 106 टक्क्यांपक्षा जस्त पाऊस पडणार आहे.

एनडीआरएफ पथक तैनात करण्याचे आदेश –

तीन महापुराचा कटू अनुभव लक्षात घेऊन प्रशासन अलर्टवर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या 15 जूनपासून एनडीआरएफ पथके जिल्ह्यात तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईत झालेल्या मान्सूनपूर्व आढाव बैठकीनंतर हे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील पुरात बचावकार्यासाठी कोल्हापूरमधील विस्तारित धावपट्टी आणि नाईट लँडिंग सुविधा सुरु करा, असा प्रस्ताव पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिला आहे. त्यावर निर्णय घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

First Published on: June 2, 2022 9:13 PM
Exit mobile version