मनसेच्या सभेपूर्वीच औरंगाबादमध्ये जमावबंदीचे आदेश

मनसेच्या सभेपूर्वीच औरंगाबादमध्ये जमावबंदीचे आदेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा औरंगाबादमध्ये 1 मे रोजी होणार आहे. या सभेबाबात स्वत: राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत सांगितलं होतं. मागील दोन सभेत राज ठाकरे यांनी हिंदूत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत मशिदींवरील भोंगे उतरवा असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता राज ठाकरे यांची तिसरी सभा औरंगाबादमध्ये होणार आहे. मात्र राज यांच्या या सभेला अद्याप परवानागी मिळालेली नाही. अशातच औरंगाबादमध्ये सभेपूर्वीच जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळं आता राज ठाकरेंची सभा होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

औरंगाबाद शहराच्या हद्दीत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. औरंगाबाद पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी लागू केला जमावबंदीचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार, आज पासून 9 मे पर्यंत जमावबंदी कायम राहील. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मोठा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. जमावबंदी आदेशामुळे राज ठाकरे यांच्या सभेसमोर मोठे आव्हान असेल. मात्र असं असलं तरी मनसैनिक सभा होणार असल्याचं म्हणतं आहेत.

दरम्यान, मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष सुहास दशरथे यांची मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. आज भाजपात प्रवेश करणार आहेत. मुंबईत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन भाजपात करणार प्रवेश आहेत. सभेच्या तोंडावरच मनसेला सोडचिठ्ठी दिल्यामुळे गर्दीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मी धर्मांध नाही मी धर्माभिमानी आहे. 1 मे रोजी चला संभाजीनगर सांगणारा टीजर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या भव्य सभांचे व्हिडीओ वापरून टीजर तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे 1 मे रोजी सभेला येण्याचं टीजर मधून आवाहन करण्यात आलं आहे.

गुढी पाडव्याच्या मेळाव्यात मशिदीवरील भोंगे उतरवा नाहीतर आम्ही हनुमान चाळिसा लावणार अशी स्पष्ट भूमिका त्यांनी सभेत जाहीर केली. काही नेत्यांनी राज ठाकरेंच्या या भूमिकेचे समर्थन केलं. तर काही राजकीय पक्षांनी राज ठाकरेंवरती सडकून टिका केली आहे. टिकेला उत्तर देण्यासाठी राज ठाकरेंनी ठाण्यात दुसरी सभा घेतली.


हेही वाचा – समृद्धी महामार्गाचे उद्घाटन लांबणीवर, उन्नत मार्गाच्या सुपर स्ट्रक्चरला इजा पोहचल्याने सोहळा पुढे ढकलला

First Published on: April 26, 2022 7:59 AM
Exit mobile version