Shivtirth : राज ठाकरेंचा भाऊबीजच्या मुहूर्तावर शिवतीर्थ प्रवेश

Shivtirth : राज ठाकरेंचा भाऊबीजच्या मुहूर्तावर शिवतीर्थ प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाऊबिजेच्या मुहूर्तावर नव्या घरात प्रवेश केला आहे. राज ठाकरेंच्या नव्या घराचे नाव हे शिवतीर्थ आहे. कृष्णकुंजच्या शेजारीच राज ठाकरे यांनी नव्या इमारतीत आज शनिवारी सहकुटूंब प्रवेश केला. अमित ठाकरे यांच्या हस्ते घराची पूजा सुरू झाली. बहुमजली अशा शिवतीर्थ इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावर विशिष्ट अशी रचना केली आहे. पाच मजली इमारतीत राज ठाकरे कुटूंबाचा आज गृहप्रवेश आहे. स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही झलक यानिमित्ताने कार्यकर्त्यांना पहायला मिळाली. राज ठाकरे हे गेल्या अनेक दशकांपासून कृष्णकुंजवर राहत आहेत. पण राजकारणात शिवतीर्थाच्या निमित्ताने एका नवा अध्यायाला सुरूवात झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या इमारतीच्या बांधकामाला अतिशय वेग आला होता. अखेर राज ठाकरे कुटूंबीयांनी भाऊबिजेच्या निमित्ताने आज गृहप्रवेश केला.

कृष्णकुंज शेजारीच राज ठाकरेंची ही नवीन पाचमजली इमारत आहे. या इमारतीमध्ये वाचनालय, कॉन्फरन्स रूम, कार्यालयीन कक्ष अशी सुरूवातीच्या दोन मजल्यावरील व्यवस्था आहे. तिसऱ्या मजल्यावर राज ठाकरे हे आपल्या कुटूंबीयांसोबत राहणार आहेत. पाश्चिमात्य पद्धतीची ही संपुर्ण इमारतीची रचना आहे. मनसेचे कार्यालयदेखील याच इमारतीमध्ये असणार आहे. त्यामुळे पक्षाच्या बैठकांची व्यवस्था तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींसाठीचा आता नवा पत्ता हा शिवतिर्थ असणार आहे.

राजगड नव्हे शिवतीर्थ

मनसेच्या राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी आणि बैठकांसाठीचा याआधीचा मनसे मुख्यालयाचा पत्ता हा राजगड होता. पण हा पत्ता आता बदलणार आहे. मनसेच्या मुख्यालयाची नवीन ओळख आता राज ठाकरेंचे नवे निवासस्थान शिवतीर्थ असणार आहे. त्यामुळेच यापुढच्या काळात राजगड एवजी मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी ही शिवतीर्थासमोर असणार यात शंका नाही. आजही भाऊबिजेच्या दिवशी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी शिवतिर्थासमोर कार्यकर्ते आणि पदाधिकारी दिसून आले. अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राज ठाकरेंची एक झलक याठिकाणी शिवतीर्थावर पहायला मिळाली.

 

Posted by Sachin Maruti More on Friday, November 5, 2021

कशी आहे शिवतीर्थाची रचना

तळमजला – पार्किंगची व्यवस्था, रिसेप्शन, सिक्युरीटी आणि वेटिंग रूम

पहिला मजला – वाचनालय

दुसरा मजला – कॉन्फरन्स रूम, बैठकांसाठीचे चेंबर

तिसरा ते पाचवा मजला – निवासस्थान


राज ठाकरे दिवाळीनंतर करणार अयोध्या दौरा

First Published on: November 6, 2021 11:47 AM
Exit mobile version