राज-उद्धव एकत्र येणार? राज ठाकरेंचं मोठं विधान

राज-उद्धव एकत्र येणार? राज ठाकरेंचं मोठं विधान

महाराष्ट्राचं राजकारण ठाकरे घराण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. एकाबाजूला मुख्यमंत्री म्हणून विराजमान असलेले उद्धव ठाकरे आणि दुसरीकडे शिवसेनेतून बाहेर पडून स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन करणारे राज ठाकरे. परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र कधी येणार? हा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून विचारला जात आहे. या प्रश्नावर राज ठाकरे यांनी सूचक असं भाष्य केलं आहे. दैनिक लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत या प्रश्नावर राज ठाकरे यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.

राज ठाकरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना माझ्याकडे उत्तर नाही असं राज ठाकरे म्हणाले. “परमेश्वरास ठाऊक, देवाला मानतो म्हणून आम्ही दोघांनी एकत्र कधी यावं यावर बोलू शकत नाही. आता या प्रश्नाचे उत्तर तरी माझ्याकडे नाही. इतर कुणाकडे असेल असं मलाही वाटत नाही. माझी मनापासून इच्छा आहे की, कोरोनातून समाज बाहेर आला पाहिजे, त्यानंतर बाकीच्या गोष्टी होत राहतील,” असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं.

राज ठाकरे यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकारणावर देखील भाष्य केलं. राज्यातील राजकारण वेगळ्याच पद्धतीने सुरू असून कोण कोणत्या बिळातून बाहेर येईल हे माहिती नाही. महानगर पालिकेंच्या निवडणुकांपर्यंत जी माझी वाटचाल असेल तीच पक्षाची भूमिका असणार आहे. हा मला डोळा मारतोय, तो मला पत्र पाठवतो, त्यावर आमची कोणतीही भूमिका नसणार आहे. ज्या वेळी निवडणुका लागू होतील तेव्हा काय निर्णय घ्यायचा ते बघू, अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

 

First Published on: June 2, 2021 4:47 PM
Exit mobile version