वाशी टोलनाका तोडफोड प्रकरण: राज ठाकरेंना जामीन मंजूर

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरण: राज ठाकरेंना जामीन मंजूर

टोलनाका तोडफोड प्रकरण: राज ठाकरेंना जामीन मंजूर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी वाशी न्यायालने जामीन मंजूर केला आहे. नवी मुंबईतील वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केलं होतं. २६ जानेवारी २०१४ रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी भडकावू भाषणाने मनसैनिकांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केल्याचा आरोप राज ठाकरेंवर करण्यात आला आहे. या प्रकरणी अनेक वेळा न्यायालयात हजर राहण्यास सांगूनही राज ठाकरे हजर झाले नव्हते. त्यामुळे वाशी न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट जारी केलं. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज न्यायालयात हजर झाले होते.

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी वाशी न्यायालयाने राज ठाकरेंना जामीन मंजूर केला आहे. पुढील सुनावणी ५ मे ला होणार आहे. दरम्यान, राज ठाकरे कृष्णकुंजकडे रवाना झाले आहेत. सकाळी अकराच्या सुमारास राज ठाकरे कोर्टाकडे रवाना झाले होते. दरम्यान, न्यायालयाने राज ठाकरेंना 15 हजारांंच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तर, पुढील सुनावणीला गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली आहे. पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार आहे.

राज ठाकरेंच्या भाषणानंतर वाशी टोलनाक्याची तोडफोड

वाशीमध्ये राज ठाकरे यांनी २६ जानेवारी २०१४ रोजी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर मनसैनिकांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

First Published on: February 6, 2021 12:58 PM
Exit mobile version