Pune MNS : राज ठाकरेंच्या विरोधातील भूमिका वसंत मोरेंना भोवली, पुणे शहराध्यक्षपदावरुन हटवले

Pune MNS : राज ठाकरेंच्या विरोधातील भूमिका वसंत मोरेंना भोवली, पुणे शहराध्यक्षपदावरुन हटवले

Pune MNS : राज ठाकरेंच्या विरोधातील भूमिका वसंत मोरेंना भोवली, पुणे शहराध्यक्षपदावरुन हटवले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाढवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली. मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा त्याच मशिदींसमोर दुप्पट आवाजात लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवण्यात येईल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. तसेच मनसैनिकांना आदेश दिले होते. यानंतर मनसेच्या गोटात खळबळ उडाली होती. पुणे मनसेत यानंतर नाराजी नाट्य पाहायला मिळाले. राज्यातील मनसैनिक आदेशाचे पालन करत असताना पुण्यात मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्यात येणार नाही असे स्पष्ट केले. यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाराज झाले असल्याची चर्चा होती. यानंतर राज ठाकरेंनी गुरुवारी वसंत मोरेंना शहराध्यक्षपदावरुन हटवलं आहे. त्यांच्या जागी नगरसेवक साईनाथ बाबर यांना पुणे शहराध्यक्ष करण्यात आले आहे. वसंत मोरेंनी ट्विट करत साईनाथ बाबरचे अभिनंदनसुद्धा केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर पुणे मनसेमध्ये भूमिकेचे पालन न करणारे वसंत मोरे यांच्याविरोधात राज ठाकरेंनी कठोर भूमिका घेतली आहे. वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरुन काढून टाकण्यात आले आहे. राज ठाकरेंची भोंग्यांविरोधातील भूमिका समजली नसून मशिदींसमोर भोंगे लावण्यात येणार नाही असे वसंत मोरे यांनी म्हटलं होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. कारण वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या मतदारसंघात सर्वाधिक मतदार मुस्लिम आहेत. यामुळे दोघांसमोरही पेच निर्माण झाला होता.

वसंत मोरेंच्या नाराजी नाट्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याती पदाधिकाऱ्यांना शिवतीर्थावर येण्याचे आदेश दिले होते. यामध्ये नगरसेवक साईनाथ बाबर, अनिल शिदोरे, बाबू वागस्कर यांचा समावेश होता.

पुणे शहराध्यक्षपदी साईनाथ बाबर यांची नियुक्ती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना साईडलाईन करत नगरसेवक साईनाथ बाबर यांना पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनसेच्या अधिकृत पेजवरुन ट्विट करत माहिती देण्यात आली आहे. ट्विटमध्ये असे म्हटलं आहे की, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा!” आशा आशयाचे ट्विट मनसेनकडून करण्यात आले आहे.

शहराध्यक्षपदावरुन हटवल्यावर वसंत मोरेंचे ट्विट

वसंत मोरे यांनी आपल्याला पुणे शहर अध्यक्ष पदावरुन हटवल्यावर ट्विट केलं आहे. नवे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांचे त्यांनी अभिनंदन केलं असून मी कधीपासूनच तुझा मावळा आहे असे म्हटलं आहे. ट्विट करत वसंत मोरे म्हणाले की, अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे ” कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड, खूप खूप अभिनंदन साई! अशा आशयाचे ट्विट वसंत मोरे यांनी केलं आहे.


हेही वाचा : भोंग्यावरील भूमिकेवरुन नाराज वसंत मोरेंना राज ठाकरेंनी ‘शिवतीर्थ’वर बोलावलं

First Published on: April 7, 2022 2:47 PM
Exit mobile version