घरमहाराष्ट्रभोंग्यावरील भूमिकेवरुन नाराज वसंत मोरेंना राज ठाकरेंनी 'शिवतीर्थ'वर बोलावलं

भोंग्यावरील भूमिकेवरुन नाराज वसंत मोरेंना राज ठाकरेंनी ‘शिवतीर्थ’वर बोलावलं

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेवर पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी नाराजी दर्शवली होती. ही नाराजी दूर करण्यासाठी राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी बोलावलं आहे. राज ठाकरेंनी शुक्रवारी शिवतिर्थवर भेटण्याचे निमंत्रण दिलं आहे.

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेवर वंसत मोरे यांनी जाहीरपणे त्यांचं मत व्यक्त केलं होतं. वसंत मोरे यांनी माझ्या प्रभागात शांतता हवी असल्याने हनुमान चालीसा लावणार नसल्याचे म्हणत राज ठाकरेंचा आदेश धुडकावून लावला. सोबतच राज ठाकरेंच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतल्याचे म्हणत भूमिकाही स्पष्ट केली. दरम्यान, वसंत मोरे यांच्या या भूमिकेमुळे ते राष्ट्रवादीत जाण्याची तयारीत आहेत, असा चर्चा सुरु झाल्या आहेत. या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी त्यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवतीर्थवर बोलावलं आहे.

- Advertisement -

मला माझ्या प्रभागात शांतता हवी आहे

आमच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावली. परंतु सध्या रमजान सुरू असल्याने मला माझ्या प्रभागात शांतता हवी आहे. म्हणून मी हनुमान चालीसा वगैरे काही लावणार नाही. याचा अर्थ मी राज ठाकरे किंवा पक्षावर नाराज आहे, असा मुळीच नाही, असेही वसंत मोरे यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आलेला आहे. मशिदींवरील भोंगे काढले नाही तर हनुमान चालीसा लावणार असे राज ठाकरे म्हणाले आहेत. याचा अर्थ राज्य सरकारने मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे, असे मोरे म्हणाले.


हेही वाचा – पुणे शहराध्यक्ष वसंत मोरेंनी धुडकावला राज ठाकरेंचा आदेश

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -