रस्ते बांधणं, पूल बांधणं, हातात मोबाईल याला प्रगती मानत नाही – राज ठाकरे

रस्ते बांधणं, पूल बांधणं, हातात मोबाईल याला प्रगती मानत नाही – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधलाय. यावेळी राज ठाकरे यांनी देशातील आणि राज्यातील प्रगतीवर भाष्य केलं आहे. राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, आपण प्रगती नक्की केलं आहे. पण याचा अर्थ रस्ते बांधणं, पूल बांधणं, हातात मोबाईल याला प्रगती मानत नाही. देश म्हणून आपली काही वैचारिक प्रगती झाली का? आपण विचार करतो का? चीनसोबत तुलना करण्यात अर्थ नाही. आपल्या देशात प्रगतीच्या व्याख्या काय आहेत. असे एक ना अनेक प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत. आपल्या राज्यात आणि देशात आजही निवडणुकांमध्ये विषय बदलले नाहीत. चांगले रस्ते, पाणी , वीज शिक्षण अशा घोषणा आजही केल्या जात आहेत. पण मग आपण नक्की प्रगती कुठून गेली? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

दरवर्षी शिक्षणाचा प्रश्न कोर्टात का जातो?

राज ठाकरे यांनी यावेळी राज्यातील शिक्षणाच्या कारभारावरही प्रश्न चिन्हा निर्माण केला आहे. राज्यात दरवर्षी दहावी- बारावीच्या किंवा प्रवेशाबाबतचा प्रश्न कोर्टात का जातो? या पुर्वी मी असं कधी पाहिलं नव्हतं. हा प्रश्न कोणाला समजत नाही आहे की सोडवायचा नाही आहे. दरवर्षी आपण विद्यार्थ्यांचे हाल करणार आहोत का? आमच्यावेळी आर्ट, कॉमर्स, सायन्स पुढे फार काही नव्हते. आता वेगळे वेगळे कोर्स आहेत. परंतू तिथे गेल्यावर पुढे काय? नोकऱ्या देणार त्या प्रकारचे शिक्षण आहे का? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

विकासामध्ये लोकसंख्येचा अडथळा

राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, चांगल्या गोष्टींसाठी सक्ती करावी लागते. जेलची शिक्षा किंवा दंड घेतो यामुळे दारु पिऊन गाडी चालवणाऱ्याची संख्या कमी झाली आहे. तशीच सक्ती करावी लागणार आहे. आपण हिंदू, मुस्लिम, असं पाहिलं नाही पाहिजे. लोकशाहीत काही गोष्टींसाठी मारक ठरत असतील तर त्यावर निर्णय घ्यावे लागतील. काही विषयांमध्ये असं केल नाही तर हे विषय सुटनारच नाहीत. जोपर्यंत देशात लोकसंख्येच्याबाबत आपण विचार करत नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही. शहरांच्या विकासाचा प्लॅन होतो पण टाऊन प्लॅनिंग होत नाही. ७५ वर्षांमध्ये जर टाऊन प्लॅनिंग होत नसेल तर कसं होणार असेही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : …त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी पहिली हिंदुत्वाची हाक दिली, राज ठाकरेंनी सांगितला किस्सा


 

First Published on: August 12, 2021 8:04 PM
Exit mobile version