फार धावायला मी काय पाकीटमार आहे का?, राज ठाकरेंनी डॉक्टरांसोबतचा किस्सा सांगताच पिकला हशा

फार धावायला मी काय पाकीटमार आहे का?, राज ठाकरेंनी डॉक्टरांसोबतचा किस्सा सांगताच पिकला हशा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील सभेत विरोधकांवर फटकेबाजी केल्यानंतर मुंबईत दाखल झाले. मुंबईत त्यांनी एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. दरम्यान पुण्यातील सभेतच राज ठाकरेंनी आपल्या पायाच्या दुखण्यामुळे शस्त्रक्रिया करणार असल्याचे सांगितले आहे. याबाबतच संध्याकाळी त्यांनी कार्यक्रमात संबोधित करताना डॉक्टरांसोबतचा एक किस्सा राज ठाकरेंनी सांगितला आहे. शस्त्रक्रिया (raj thackeray leg surgery) झाल्यानंतर फार धावता येणार नाही असं डॉक्टरांनी सांगितले यावर राज ठाकरेंनी जे उत्तर दिलं ते ऐकूण सभागृहात एकच हशा पिकला होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे व्याही प्राध्यापक संजय बोरुडे यांच्या पुस्तकाच्या प्रकाश सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी संबोधित करताना राजकीय शैलीत फटकेबाजी केली आहे. राज ठाकरे नेहमीच आपल्या मिश्किल वक्तव्यामुळेसुद्धा चर्चेत येत असतात. यावेळी त्यांनी मिश्किलपणे गोष्ट सांगितली आहे. दरम्यान राज ठाकरेंनी सांगितले की, पायावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. डॉक्टर एकदा भेटायला आले होते. त्यावेळी त्यांनी संभाषणादरम्यान सांगितले, ही शस्त्र क्रिया झाल्यानंतर तुम्हाला फार धावायला येणार नाही. यावर राज ठाकरेंनी उत्तर दिलं की, अहो, फार धावायला मी काय पाकिटमार आहे का? असं कुठचं फार धावायचं मला असा किस्सा राज ठाकरेंनी सांगितला असताच एकच हशा पिकला आहे.

पथ्यपाणी गांभीर्याने घेतलं पाहिजे – राज ठाकरे

दरम्यान राज ठाकरे यांनी पुढे म्हटलं आहे की, आरोग्यसंदर्भात पथ्यपाणी आपण गांभीर्याने घेत नाही. उद्या करु आज करु असे करुन टाळाटाळ करत असतो. मला आता त्रास होत असल्यामुळे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. मी खरंतर बॅडमिंटन खेळणारा, क्रिकेट खेळणारा, टेनिस खेळणारा आहे. पण सध्या मला कोणताही व्यायाम करता येत नाहीये. मला कुठलाही खेळ खेळता येत नाही. यामुळे कंटाळून एकदाचं ऑपरेशन करुन टाकण्याचा निर्णय़ घेतला. ऑपरेशननंतर मला धावता येईल म्हणून नाही तर सगळं सुरळीत होईल.


हेही वाचा : आपल्या खासदारावर शंका असेल तर बृजभूषण यांना निलंबित करा, काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

First Published on: May 23, 2022 9:27 AM
Exit mobile version