मागणी मान्य केल्याबद्दल राज ठाकरेंनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

मागणी मान्य केल्याबद्दल राज ठाकरेंनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

मागणी मान्य केल्याबद्दल राज ठाकरेंनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

केंद्राने गुरुवारी रात्री हाफकिन संस्थेला कोरोना लस उत्पादनाची परवानी दिली. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. माझी मागणी मान्य केली त्याबद्दल आभार, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी हाफकिन संस्थेला लस उत्पादन करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली होती.

लसीची संख्या वाढवण्यासाठी हाफकिन संस्थेमध्ये निर्मितीची परवानगी द्यावी अशी मागणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. पंतप्रधानांनी त्याला परवानगी दिली आहे. याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार मानतो. या महामारीत केंद्राकडून असाच पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

राज्यात लसींचा तुटवडा जाणवत आहे. लसीकरणाला वेग देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही हाफकीन संस्थेला लस उत्पादन करण्याची परवानगी देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. दरम्यान, केंद्राने आता परवानगी दिली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे.

 

First Published on: April 16, 2021 11:31 AM
Exit mobile version