नाशिक मनसेत खांदेपालट, अंतर्गत नाराजीमुळे राज ठाकरेंचा मोठा निर्णय

नाशिक मनसेत खांदेपालट, अंतर्गत नाराजीमुळे राज ठाकरेंचा मोठा निर्णय

राज ठाकरेंवर उद्या होणार शस्त्रक्रिया

नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाअंतर्गत मोठे फेरबदल केले आहेत. मनसेच्या जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष अशा दोन्ही पदांवर नवीन नेतृत्वाला संधी राज ठाकरे यांनी दिली आहे. राज ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. आजच्या दिवसभराच्या शाखाध्यक्षांच्या मेळाव्यात याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. जिल्हाध्य़क्ष आणि शहराध्यक्ष अशा दोन्ही पदांची खांदेपालट झाली आहे. एकणु जिल्हा आणि शहर पातळीवर मनसे कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी पाहूनच राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचे मन जाणून घेत हे बदल केले आहे. राज ठाकरेंकडून आज दिवसभरात या बदलांबाबतची घोषणा अधिकृतपणे केली जाईल अशी माहिती आहे. नाशिक महापालिकेच्या तोंडावर नाशिक मनसेमध्ये मोठे बदल केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Raj thackeray to take big decision in nashik within nashik mns during nashik tour)

नाशिक दौऱ्यात राज ठाकरे आज दिवसभरातील नाशिक दौऱ्यातील कार्यक्रमात विद्यमान जिल्हाध्यक्ष दिलीप दातार यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटनालाही राज ठाकरेंनी हजेरी लावली. त्यासोबतच नवीन शाखाध्यक्षांच्या नियुक्त्याही आज दिवसभरात होतील असे कळते. त्यानंतर राज ठाकरे हे शाखाध्यक्षांचा मेळावाही घेणार असल्याची माहिती आहे. मेळाव्यानंतर प्रसारमाध्यमांशीही संवाद साधणार असल्याचे कळते.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी यावेळी नाशिक मनसेतील बदल जाहीर केले. जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष या नावांसोबतच शहर समन्वयक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष यासारख्या नावांची अधिकृत घोषणा बाळा नांदगावकर यांनी जाहीर केली.

कोणाकडे काय जबाबदारी ?

सचिन भोसले शहर समन्वयक

रतन इचम ग्रामीण जिल्हाध्यक्ष

अंकुश पवार जिल्हाध्यक्ष सिन्नर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा कळवण नाशिक तालुका

दिलीप दातार शहराध्यक्ष

सध्याचे शहराध्यक्ष अंकुश पवार यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष पदावर करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. तर जिल्हाध्यक्ष दिलीप दातार यांची नियुक्ती शहराध्यक्ष या पगावर करण्यात येणरा असल्याचे कळते. एकुणच दोन्ही नेतृत्वाबद्दल कार्यकर्त्यांच्या तक्रारी आणि कुरबुरीमुळेच ही जबाबदारी बदलाची कारवाई करण्यात आल्याचे कळते. सध्याचे शहराध्यक्ष अंकुश पवार यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर जिल्हाध्यक्ष पदावर असणारे दिलीप दातार यांना शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दोन्ही पदांच्या बाबतीत अदलाबदल करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एकुणच कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे आणि पदाधिकाऱ्यांच्या कामावरील नाराजीमुळेच मनसे अध्यक्षांनी हा निर्णय घेतला असल्याचे कळते. दोन्ही नेतृत्वावर कार्यकर्त्यांची असलेली नाराजी आणि कामाबाबतची नाराजी हेच उचलबांगडीचे कारण असल्याचे मानले जात आहे.


हेही वाचा – Video : राज ठाकरेंचाही ड्रायव्हिंग मूड, मनसैनिकांकडून सव्वा कोटींची लँड रोवर गिफ्ट


 

First Published on: September 23, 2021 12:45 PM
Exit mobile version