राज ठाकरेंचा संपादकांना सल्ला, म्हणाले – “आधी लेख लिहून तासायचे..”

राज ठाकरेंचा संपादकांना सल्ला, म्हणाले – “आधी लेख लिहून तासायचे..”

Raj Thackeray : टोल नाक्यांबाबत राज ठाकरे यांची महत्त्वाची घोषणा

पुणे : पिंपरी चिंचवड येथे झालेल्या एडिटर्स गिल्ड या कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी भाषण करून पत्रकारांच्या विविध मुद्द्यांवर आपले स्पष्ट मत व्यक्त केले. या कार्यक्रमात राज ठाकरे यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यावरून आपले मत केले. तर पत्रकारांनी कशा पद्धतीने पत्रकारिता केली पाहिजे, याबाबतचा सल्ला देखील त्यांच्याकडून देण्यात आला. (Raj Thackeray’s advice to Print and Electronic Media editors)

हेही वाचा – ट्रोल करण्यासाठी राजकीय पक्षांनी पाळली लोकं, राज ठाकरेंचा खोचक टोला

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 1932 साली बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेचे रोपटे महाराष्ट्रात लावले. ती पत्रकारिता आजही जिवंत आहे, असे मी यासाठी म्हणतोय कारण इतर राज्यातील पत्रकारिता पाहिली तर त्यापेक्षा महाराष्ट्रातील पत्रकारिता उत्तम असल्याचे जाणवते. अजित पवार सत्तेत गेले. याचा खरंतर राग यायला पाहिजे. पंतप्रधानांनी आरोप केला की 70 हजार कोटींचा घोटाळा झाला. त्यानंतर सहा दिवसात अजित पवार सत्तेत येतात. असे घडल्यानंतर अजित पवारांना या घटनेवरून प्रश्न विचारणारे पत्रकार अजित पवारांनी उत्तर दिल्यावर हसत बसतात? हे अत्यंत चुकीचे आहे. उलट पत्रकारांना सुरू असलेल्या राजकारणाची चिड आली पाहिजे. राजकीय प्रतारणा केल्यानंतर पूर्वीचे संपादक गप्प बसायचे नाहीत. संपादकीय असेल किंवा लेख लिहून त्या राजकारण्यांची तासायचे. समोरच्याला समजले पाहिजे की या माणसाने घोडचूक केली आहे, असे लिहायचे. आताच्या संपादकांनीही तसेच लिखाण केले पाहिजे.

राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात 1996 सालचा एक किस्सा सांगितला. याबाबत सांगताना ते म्हणाले की, 1996 च्या दरम्यान माझ्यावर खुनाचा एक आरोप झाला. त्या प्रकरणात विविध प्रकारच्या हेडलाइन्स येत होत्या. एका सांज दैनिकाने तर मी घरात असताना राज ठाकरे फरार असे हेडिंग दिले होते. या रागातून जर माझ्यातला माणूस जागा झाला मी जर एखाद्याला कानाखाली वाजवली तर त्याला हल्ला म्हणणार का? पत्रकारांचे काम प्रबोधन करणे आहे. खोट्या बातम्या करणे नाही, पाकिटे घ्यायची आणि असले उद्योग करायचे हे सगळं करणं आता बंद करा, असेही राज ठाकरे ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले. वाट्टेल ते बोलाल तर मी पण राज ठाकरे आहे हे लक्षात ठेवा.

सध्या पत्रकारितेतही भलतंच सुरू आहे. याला काय वाटतं आणि त्याला काय वाटतं हेच सध्या सुरू आहे. टेलिव्हजनवर आजही चांगले काम करणारे लोक आहेत. पण व्हिज्युअली जे समोर दिसते ते हेच आहे. राजकारणाची भाषा घसरली. अनेक राजकीय लोक वाह्यातपणे बोलू लागले आहेत. कारण तुम्ही दाखवता म्हणून ते बोलतात. त्यांना तुम्ही दाखवूच नका, मग कुठे बोलतील हे लोक? असा सवाल राज ठाकरे यांनी पत्रकारांच्या समोर उपस्थित केला.

First Published on: August 19, 2023 4:14 PM
Exit mobile version