घरमहाराष्ट्रपुणेट्रोल करण्यासाठी राजकीय पक्षांनी पाळली लोकं, राज ठाकरेंचा खोचक टोला

ट्रोल करण्यासाठी राजकीय पक्षांनी पाळली लोकं, राज ठाकरेंचा खोचक टोला

Subscribe

पिंपरी चिंचवड येथे झालेल्या एडिटर्स गिल्ड या कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी भाषण करून पत्रकारांच्या विविध मुद्द्यांवर आपले स्पष्ट मत व्यक्त केले.

पुणे : पत्रकारांनी निर्भीड पत्रकारिता करावी. जे पत्रकार लिहितात, त्यामुळे तुम्हाला ट्रोल करण्यात येते, पण तुम्ही ते वाचता कशाला? हल्ली तर ट्रोल करण्यासाठी राजकीय पक्षांनी लोकांना पाळून ठेवले आहे, त्यासाठी त्यांनी पैसे देण्यात येतात, असे स्पष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. पिंपरी चिंचवड येथे झालेल्या एडिटर्स गिल्ड या कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी भाषण करून पत्रकारांच्या विविध मुद्द्यांवर आपले स्पष्ट मत व्यक्त केले. या कार्यक्रमात राज ठाकरे यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. (Political parties follow people to troll, Raj Thackeray’s criticism)

हेही वाचा – मालवणी शब्दांच्या तलवारी आम्हाला काढायला लावू नका, आशिष शेलारांचा ठाकरे गटाला इशारा

- Advertisement -

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 1932 साली बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेचे रोपटे महाराष्ट्रात लावले. ती पत्रकारिता आजही जिवंत आहे, असे मी यासाठी म्हणतोय कारण इतर राज्यातील पत्रकारिता पाहिली तर त्यापेक्षा महाराष्ट्रातील पत्रकारिता उत्तम असल्याचे जाणवते. हल्ली पत्रकारांनी काही लिहिले की, त्यांना ट्रोल करण्यात येते. पण ट्रोल वगैरे करणे, मुळात हे तुम्ही वाचताच कशाला. एकदा माझा कार्यक्रम, बोलणे संपले की मी पुन्हा कमेंट्स पाहत नाही. कारण मी बोलले की झाले. मग तुम्ही कशाला पाहता, हे मोबाईल म्हणजे रिकम्यांचा धंदा आहे. घरी आले की बोटं आपटत बसायचे. कशाचे काही ज्ञान नसताना व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपले मत व्यक्त करायचे. खरं तर राजकारण्यांनी यासाठी विशेष लोकं पाळलेली आहेत. त्यामुळे तुम्ही याकडे लक्ष देणे बंद करावे. ज्यांना ज्ञान नाही, त्यांना कशाला गांभीर्याने घ्यायचे, असा सल्ला राज ठाकरेंनी यावेळी पत्रकारांना दिला.

यावेळी राज ठाकरे यांनी काही पत्रकारांकडून मुद्दामहून करण्यात येणाऱ्या गोष्टींचा देखील उल्लेख केला. याबाबत बोलताना ते म्हणाले की, हल्ली अनेक वाया गेलेले पत्रकार अनेक पाहत आहे आणि ते प्रमुख हुद्द्यावर बसले आहेत. अनेक पत्रकार हे मंत्र्यांकडे कामाला लागले आहेत. 20-25 वर्षांपूर्वी ही काम लपून करण्यात येत होती, आता हे उघडपणे होते. त्या पत्रकारांकडून ते सांगण्यात येते. मग ज्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये येतात, त्यावेळी ते कोणाचा ना कोणाचा लेबल लावून येतात, मग तेव्हा काय उत्तर द्यावी असा प्रश्न पडतो, असे राज ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

पत्रकार मला म्हणतात, तुमच्या सभांना गर्दी होते, पण मतं मिळत नाहीत. मला सांगा, 2009 ते आजवर माझ्या उमेदवारांना मतं कुठून मिळतात. काय रतन खत्रीने आकडे काढले होते का? सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नसतो. सत्ता हातात आली की ती जायला सुरू होते. विरोधी कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हारत असतो. आता तुम्ही पत्रकार आहात, म्हणजे तुम्ही काय आमचे वाभाडे काढणार का? राज ठाकरे आहे मी, हे मी खपवून घेणार नाही. मी यावर व्यक्त होणारच, असा थेट इशारा देखील राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -