उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या विरोधात न बोलण्याबाबत विडाच उचलला होता – राजेश क्षीरसागर

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या विरोधात न बोलण्याबाबत विडाच उचलला होता – राजेश क्षीरसागर

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विकासाचं एक व्हिजन आहे. आम्ही २०१९ ला विधानसभा निवडणूक जरी हरलो असलो तरी आम्हाला उभारी देण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केलं आहे. आमच्या विरोधकांनी ही परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात न बोलण्याबाबत विडाच उचलला होता, असं शिवसेनेचे बंडखोर आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले.

…न बोलण्याबाबत विडाच उचलला होता

राजेश क्षीरसागर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात कुणीही काही बोलत नव्हतं. त्यांच्याविरोधात कुणी बोलायचं नाही, असा विडाच आम्ही उचलला होता. त्यांनी ज्यांनी घेरलं होतं, ते त्यांच्याविरोधात बोलत होते.

आम्ही पहिल्यापासून सेफ होतो

दोन तृतीयांश बहुमत आमच्याकडे होतं. त्यामुळे आम्ही पहिल्यापासून सेफ होतो. जर आम्ही सेफ नसतो तर त्याठिकाणचे आमदार आलेच नसते. त्यामुळे आम्ही पहिल्यापासूनच दोन तृतीयांश बहुमत घेऊनच एकत्र येतो. तसेच सगळ्यांना त्याची खात्री देखील होती, असं क्षीरसागर म्हणाले.

महापालिकेच्या निवडणुका संदर्भात तुमची भूमिका काय?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता क्षीरसागर म्हणाले की, महापालिकेच्या निवडणुकांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आदेश देतील. त्यापद्धतीने आम्ही पुढे जाऊ, असं क्षीरसागर म्हणाले.


हेही वाचा : माझी सुरक्षा काढून घ्या, आमदार संतोष बांगरांचं एसपींना पत्र


 

First Published on: July 8, 2022 4:40 PM
Exit mobile version