माझी सुरक्षा काढून घ्या, आमदार संतोष बांगरांचं एसपींना पत्र

मागील काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडी सुरू आहेत. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे २०वे मुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता शिंदे गट-भाजप सरकार स्थापन झालं आहे. दरम्यान, माझी सुरक्षा काढून घ्या, अशा प्रकारचं पत्र शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी एसपींना दिलं आहे.

सध्या माझ्या संरक्षणार्थ आपल्या विभागाकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे. तरी साहेबांना विनंती करण्यात येत की, माझ्या सुरक्षेसाठी देण्यात आलेली सुरक्षा वापस देण्यात यावी. सध्या माझ्या संरक्षणार्थ दोन अंगरक्षक नियुक्त आहेत. त्यामध्ये अतिरिक्त अंगरक्षक म्हणून डिंगाबर ठेंगडे यांची माझ्या सुरक्षेसाठी अंगरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात यावे, असं या पत्रात म्हटलं आहे.

हे पत्र लिहिल्यानंतरही पोलीस प्रशानसाकडून अद्याप कोणताही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाहीये. त्यामुळे पोलीस आक्रमक बांगरांची सुरक्षा काढून घेणार की कायम ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. राज्यातील शिवसैनिकांचा रोष पाहता या बंडखोर आमदारांना एकनाथ शिंदे यांच्या सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली आहे.

कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी आपली सुरक्षा काढून घेण्यात यावी, अशी विनंती जिल्हा पोलीस अधीक्षकांना केली आहे. तसेच हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षकांना संतोष बांगर यांनी पत्र दिलंय. मात्र, त्या पत्रावर अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती आहे.


हेही वाचा : शिवसेनेच्या चिन्हाचे काय होईल? कायदेतज्ज्ञ म्हणतात…