शिवसेनेच्या मंत्र्यांकडून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडले जाताहेत, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा आरोप

शिवसेनेच्या मंत्र्यांकडून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडले जाताहेत, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा आरोप

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीतला स्थानिक संघर्ष समोर आला आहे. शिवसेनेचे दोन मंत्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धमकावतात असा आरोप राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. तसेच शिवसेनेच्या मंत्र्यांकडून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडले जात आहे असा आरोप टोपेंनी केला आहे. पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं असून यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील व्यासपीठावर उपस्थित होत्या.

काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारची स्थापन केली. परंतु आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्तेत न्याय मिळत नसून, शिवसेनेच्या मंत्र्यांकडून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडले जात आहे, असा आरोप राजेश टोपे यांनी केला आहे.

राज्यातील सत्तेत सोबत असतानाही सत्तेचा वाटा मिळत असून आमच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप काँग्रकडून सतत केला जातोय. पण आता राष्ट्रवादीची भर पडली असून शिवसेना मंत्र्यांकडून राष्ट्रवादीचे कार्येकर्ते फोडले जात असल्याचा आरोप टोपेंनी केला आहे.

राजेश टोपे यांच्या या आरोपाला शिवसेनेच्या मंत्र्यांनी उत्तर दिलंय. टोपेंची आरोप खोटे असल्याचं रोहयो मंत्री भुमरे म्हणाले आहेत. तर राष्ट्रवादी हा पक्ष प्रायव्हेट कॅरियर झाला असून, त्यांना फोडण्याची गरज काय असं महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. दरम्यान, एकीकडे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत युती करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तर दुसरीकडे काहीही करूनही दोन पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र यायला तयार नाहीयेत. त्यामुळे दोन्ही पक्षांचे भवितव्य काय असेल, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.


हेही वाचा : कोरोनाची लहानग्यांवर वक्रदृष्टी, मुलांना शाळेत पाठवायचं की नाही? पालकांमध्ये संभ्रम


 

First Published on: April 19, 2022 6:39 PM
Exit mobile version