राज्यात १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण स्थगित, ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य – राजेश टोपे

राज्यात १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण स्थगित, ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य – राजेश टोपे

सर्वसामान्यांच्या लोकल प्रवेशाला मुख्यमंत्र्यांचा नकार, तर लोकलबाबत विचार सुरु असल्याची टोपेंची माहिती

राज्यात तुर्त १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण स्थगित करण्यात आले आहे. तर ४५ वर्षांवरील दुसऱ्या लसीच्या डोसला प्राधान्य देण्यात येणार आहे. येत्या २० मे नंतर दीड कोटी लसींचे डोस देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वास सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अदर पुनावाला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. सीरमकडून हे डोस मिळाल्यानंतर पुन्हा १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासंदर्भात निर्णय घेतला जाईल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील लॉकडाऊन १५ दिवसांच्या कालावधीने वाढवण्यात येण्यावर चर्चा झाली असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढणार

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊन केल्यामुळे राज्यातील कोरोना परिस्थिती सुधारली आहे. राज्यातील पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. अजूनही काही जिल्ह्यांत कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे सर्व सदस्यांची राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याच्याबाबती मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यावर अधिक कल असल्यामुळे ३१ मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन करण्यात येईल. येत्या ३ दिवसांत लॉकडाऊन बाबत अधिक माहिती जारी करण्यात येईल.

४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य

राज्यात ४५ वर्षांवरील नागरिकांच्या दुसऱ्या लसीच्या डोसचा कालावधी येत आहे. यामध्ये जवळपास २० लाख नागरिकांच्या लसीकरणाचा दुसऱ्या डोस देण्यात येणार आहे. या नागरिकांच्या लसीकरणासाठी लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्र सरकारकडून कमी लसीचा अपुरा पुरवठा होत आहे. लसीच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ वर्षांमधील नागरिकांचे लसीकरण तुर्त स्थगित करण्यात आले आहेत. सध्या राज्यात १६ लाख कोव्हिशिल्ड डोस दुसऱ्या डोससाठी लागणार आहेत. तर ४ लाख कोवॅक्सिन डोस असे मिळून २० लाख नागरिकांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण बाकी आहे. तसेच सध्या आपल्याकडे ७ लाख कोव्हिशिल्ड आणि ३ लाख कोवॅक्सिनचे डोस असे मिळून १० लाख डोस उपलब्ध आहेत. यामुळे सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसऱ्या डोससाठी प्राधान्याने येत्या ३ दिवसांत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

लसीच्या खरेदीसाठी ग्लोबल टेंडर

ग्लोबल टेंडरमध्ये लस खरेदी करण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु ग्लोबल टेंडरकडून फायजर, मॉडर्ना, जॉनसन एण्ड जॉनसन या लसींना केंद्र सरकारने परवानगी दिली पाहिजे. तसेच या लसींना कोल्ड स्टोरेजची गरज आहे. त्या लसींना मायनस डिग्रीमध्ये ठेवण्यात येते तर सध्या भारतातील लसींना २ डिग्रीमध्ये ठेवण्यात येत आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास ग्लोबल टेंडर काढण्यात येईल असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. सर्व सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोना लसीकरणाबाबत संपुर्ण परिस्थिती सांगावी असे सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

First Published on: May 12, 2021 7:39 PM
Exit mobile version