सर्वसामान्यांच्या लोकल प्रवेशाला मुख्यमंत्र्यांचा नकार, तर लोकलबाबत विचार सुरु असल्याची टोपेंची माहिती

सर्वसामान्यांच्या लोकल प्रवेशाला मुख्यमंत्र्यांचा नकार, तर लोकलबाबत विचार सुरु असल्याची टोपेंची माहिती

सर्वसामान्यांच्या लोकल प्रवेशाला मुख्यमंत्र्यांचा नकार, तर लोकलबाबत विचार सुरु असल्याची टोपेंची माहिती

सर्वसामान्य लोकांच्या प्रवेशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नकार दिला आहे. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लोकबाबत विचार सुरु असल्याची माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी तुर्त या प्रकरणास स्थगिती दिली असून विचारविनिमय सुरुच असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. कोरोना नियमांचे पालन करणं गरजेचे असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांत अजूनही कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्यामुळे तिसऱ्या गटातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. टास्क फोर्स, तज्ज्ञांसोबत चर्चा करुन मुख्यमंत्री लोकलबाबत निर्णय घेतील असे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली यावेळी राजेश टोपेंनी म्हटलं आहे की, कोरोनाचे नियम पाळणं गरजेचे आहे. जर कोणी बाहेर निघताना कोरोना नियमांचे पालन करत नसेल, कोण मास्क वापरत नसले तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. लोकांनी कोरोना नियमांचे कडक पालन केले पाहिजे, लोकलसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाही म्हटलं नाही त्यांनी तुर्त हे प्रकरण होल्डवर ठेवले असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. लोकल सुरु करण्यासंदर्भात मागणी आहे की दोन कोरोना लसीचे डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे. परंतू याचे परिणाम मुख्यमंत्र्यांना बघावे लागतात जर का ही मागणी मान्य केली तर कोरोना नियंत्रणात कसा राहिल. त्याच्याबाबतीत चर्चा करण्याची गरज आहे. प्रत्येकाने दोन डोस घेतले आहेत का याची पडताळणी करणं कसं शक्य होईल याबाबत माहिती घेऊन तज्ज्ञांच्या विचाराने निर्णय घेतीलच असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

मंदिरांबाबत निर्णय नाही

राज्य सरकारकडून तुर्त मंदिरांबाबतीतच्या निर्णयावर स्थगिती देण्यात आली आहे. मंदिरांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मंदिरांबाबत लागू असलेले निर्बंध कायम असून थोड्या दिवसांनी याबाबतही मुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

११ जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट अधिक

राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटि रेट अद्यापही अधिक आहे. या जिल्ह्यांना ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंट या तीन पद्धती वेगानं सुरु ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पूरग्रस्त भागातील व्यवस्थापानाचे काम वेगळ्या पद्धतीनं सुरु आहे. पूरग्रस्त भागातील कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या उपाययोजनांच्या आधारे प्रशासन काम करत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

झिका विषाणूचे एकच प्रकरण समोर आले असून ते पुण्यातील पुरंदर तालुक्यातील आहे. झिका व्हायरस ज्या ठिकाणी आढळला आहे तेथील सर्व भागात आवश्यक काळजी घेण्यात आली आहे. सांडपाणी, दुषित पाणी साचलेल्या ठिकाणी फवारणी करुन काळजी घेतली जात असल्याचेही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

First Published on: August 3, 2021 12:48 PM
Exit mobile version