Ram Navami Wishes : आजची श्रीराम नवमी माझ्यासाठी विशेष आनंददायी; राज ठाकरेंकडून शुभेच्छा

Ram Navami Wishes : आजची श्रीराम नवमी माझ्यासाठी विशेष आनंददायी; राज ठाकरेंकडून शुभेच्छा

मुंबई : आज अयोध्येत राममंदिर उभं राहिलेलं असताना, आजची श्रीराम नवमी ही माझ्यासाठी विशेष आनंददायी, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. शिवाय, विरोधकांवर ही राज ठाकरेंनी निशाणा साधला आहे. ‘भारतासारख्या खंडप्राय देशांत ऐक्य घडवणं हे तसे कठीण पण पिढ्यानपिढ्या ज्याला जसा श्रीराम भावला, तसा त्याने तो व्यक्त केला आणि त्यामुळे हा मर्यादापुरुषोत्तम देशाला बांधून ठेवणारी एक शक्ती ठरली. या शक्तीला किंवा तिच्या अस्तित्वालाच नाकारण्याचे काम स्वतंत्र भारतात काही पक्षांकडून घडलं, ते का घडलं असेल देव जाणो’, असे म्हणत राज ठाकरेंनी राम मंदिराला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला. (Ram Navami Wishes MNS Leader Raj Thackeray Slams Oppositions On Occasion Of Ram Navami)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवरून राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे विरोधकांवरही निशाणा साधला आहे. “श्रीराम नवमीच्या सर्व हिंदू बंधू-भगिनींना मनापासून शुभेच्छा. भगवान श्रीरामांना आपण मर्यादापुरुषोत्तम मानतो आणि यातच त्यांचे श्रेष्ठत्व व्यक्त होते. ज्यांनी नीतिमत्ता, धर्म, शास्त्र, व्यवहार यात स्वतः आखून घेतलेली चौकट कधीच ओलांडली नाही असे भगवान श्रीराम”, असे राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – Heat wave : शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करा, राज ठाकरेंचे राज्य सरकारला आवाहन

याशिवाय, “धर्म, राजकारण, ईश्वर यांची गल्लत हिंदूधर्मीयांकडून कधीच झाली नाही, आणि होणार देखील नाही. याचं कारण श्रीराम असोत भगवान श्रीकृष्ण की शंकर हे माणसाच्या मनातील आदर्शांची, स्वप्नांची आणि त्यागाची प्रतीकं आहेत, ती धर्मप्रसाराची माध्यमं नव्हती. असो. पण आज अयोध्येत राममंदिर उभं राहिलेलं असताना, आजची श्रीराम नवमी ही माझ्यासाठी विशेष आनंददायी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुन्हा एकदा सर्वाना रामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा”, असे म्हणत राज ठाकरेंनी रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.


हेही वाचा – Maharashtra Bhushan accident : महाराष्ट्र भूषण सोहळा दुर्घटनेचा ठपका कुणावर? अहवालाचं काय झालं?

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 17, 2024 9:48 AM
Exit mobile version