घरमहाराष्ट्रHeat wave : शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करा, राज ठाकरेंचे राज्य...

Heat wave : शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करा, राज ठाकरेंचे राज्य सरकारला आवाहन

Subscribe

न्हाळ्याचा दीर्घकाळ शिल्लक आहे, त्यामुळे हवामानात काय बदल होऊ शकतील याचे अचूक अंदाज आले तर एकूणच लोकांना त्यांच्या कामांचे नियोजन करता येईल, असे राज ठाकरे यांनी सुचविले आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरातील तापमानात प्रचंड वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यातच, मंगळवारी तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केले आहे.

मुंबईत सोमवारपासून तापमानाचा पारा चढताच राहिला आहे. कोकण विभागासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. मुंबईत सोमवारी 37.9 अंश सेल्सिअस सांताक्रूझ येथे तर, कुलाबा येथे 34.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली होती. पालघर जिल्ह्यातील विरार येथे 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

- Advertisement -

या तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ट्वीट केले आहे. गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण या भागांत दिवसाचे सरासरी तापमान हे जवळपास 40 अंशांपर्यंत गेले आहे. अर्थात, उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाही. उष्णतेची लाट आली आहे, असे जाहीर झाले आहे. मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

अशा परिस्थितीत शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू व्हायला अजून काही काळ असल्यामुळे लहान मुलांना शाळेत जावे लागत आहे. आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी, असे सांगतानाच, तसेच उन्हाळ्याचा दीर्घकाळ शिल्लक आहे, त्यामुळे हवामानात काय बदल होऊ शकतील याचे अचूक अंदाज आले तर एकूणच लोकांना त्यांच्या कामांचे नियोजन करता येईल, असेही त्यांनी सुचविले आहे.

उष्णतेच्या लाटेत स्वतःची काळजी घ्या, असे मनसैनिकांना आवाहन त्यांनी केले असून या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे तसेच निराधार आणि बेघर लोकांचे होतात. त्यामुळे त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल याची तजवीज करा, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Temperature Mumbai : मुंबईसह कोकण विभागातील तापमानात प्रचंड वाढ; उष्णतेच्या लाटेचा IMDचा इशारा


Edited by – Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -