वंचित आघाडीला महाराष्ट्रात यश मिळणार नाही – रामदास आठवले

वंचित आघाडीला महाराष्ट्रात यश मिळणार नाही – रामदास आठवले

‘वंचित आघाडीला महाराष्ट्रात यश मिळणार नाही’, असे स्पष्ट मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मांडले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आठवले डोंबिवलीत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत युती करुन बहुजन विकास आघाडीची स्थापना केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे याचा फटका रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टीलाही बसू शकतो. याच पार्श्वभूमीवर त्यांना प्रश्व विचारले असता, वंचित आघाडीला महाराष्ट्रात यश मिळणार नसल्याचे म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले रामदास आठवले?

रामदास आठवले म्हणाले की, ‘वंचित आघाडीच्या मतांचा फायदा आमच्या सेना-भाजपा आघाडीला होणार. प्रकाश आंबेडकर वंचित आघाडीचे नेते आहेत. आपल्या पक्षाबाबत काय भूमिका घ्यावी, हा त्यांचा अधिकार आहे. परंतु वंचित आघाडी वंचिताना सत्तेपासून वंचित ठेवणार आहे. त्या वंचिताना माझे आवाहन आहे कि, सत्तेसाठी तुम्ही एकत्र आलात तर तुम्ही माझ्यासोबत आले पाहिजे. प्रकाश आंबेडकरसोबत जावून तुम्हाला सत्ता मिळणार नाही. वंचित समाजाचे लोक आमच्यासोबतच आहेत. काही नारज लोक तिकडे गेलेले असले तरी महाआघाडीसोबत वंचित समाजाचे लोक सहभागी आहेत. यामुळे वंचित आघाडीला यश मिळणार नाही.’

First Published on: February 13, 2019 8:07 PM
Exit mobile version