आरक्षणासंबंधी मागण्यांसाठी आरपीआय अधिवेशनावेळी आंदोलन करणार, रामदास आठवलेंचा इशारा

आरक्षणासंबंधी मागण्यांसाठी आरपीआय अधिवेशनावेळी आंदोलन करणार, रामदास आठवलेंचा इशारा

मराठा समाजाच्या आरक्षणाला सुरुवातीपासून रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिलेला आहे.

राज्याचे विधिमंडळ पावसाळी अधिवेशन अवघ्या काही दिवसांवर आलं आहे. या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण, पदोन्नती आरक्षण,ओबीसी आरक्षण, मुस्लिम समाजाचे आरक्षण याबाबत निदर्शनं करणार असल्याचा इशारा केंद्रीय मंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांनी इशारा दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विधानसभा अधिवेशन हे २ दिवसांचे ठेवण्यात आलं आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. तसेच रामदास आठवे यांच्या आदेशाने निदर्शनं करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली.

राज्यातील नागरिकांच्या प्रश्नांवर मुंबईतील आझाद मैदानावर ६ जुलै रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये अनुसूचित जाती जमातींना आणि इतर मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण द्यावे, मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकले पाहिजे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका स्थगित करण्यात याव्यात अशी मागणी आरपीआयतर्फे करण्यात आली आहे. तसेच मुस्लिम समाजालाही ५ टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे आरपीआय कडून इशारा देण्यात आला आहे.

पदोन्नतीमधील आरक्षणासाठी आरपीआयचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे १ ते ७ जूनदरम्यान राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. राज्य सरकारला विरोधकांकडून मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण,पदोन्नतीच्या आरक्षणावरुन घेरणार असल्याचे म्हटलं आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण गमावले असल्याचा आरोप आरपीआय अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केला आहे.

First Published on: July 1, 2021 7:06 PM
Exit mobile version