देशाच्या भल्यासाठी पवारांनी मोदींना पाठिंबा द्यावा – आठवले

देशाच्या भल्यासाठी पवारांनी मोदींना पाठिंबा द्यावा – आठवले

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना एनडीएत येण्याची ऑफर दिली आहे. देशाच्या भल्यासाठी पवारांनी मोदींना पाठिंबा द्यावा, असं रामदास आठवले म्हणाले. शरद पवार केंद्रीय मंत्रीमंडळात आले तर त्यांचा अनुभव फायद्याचा ठरेल. यासाठी पवारांनी एनडीएसोबत यावं, असं आवाहन आठवलेंनी केलं आहे.

शिवसेना-भाजप दोघांनी बंडखोरी करुन एकमेकांच्या जागा पाडल्या, असं रामदास आठवले म्हणाले. भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली असती तर, १२०-१३० जागा मिळाल्या असत्या. आणि सरकार स्थापन करायला आम्ही पवारांना विनंती केली असती, असं रामदास आठवलेंनी म्हटलं. राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत न जाता देशाचा विचार करत मोदींना पाठिंबा द्यायला हवा होता. राष्ट्रवादीचा शिवसेनेसोबत फायदा नाही. त्यांनी भाजपसोबत यावं, असं आवाहन रामदास आठवलेंनी केलं.

महाविकास आघाडीत दलितांवरील अत्याचार वाढले

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून आणि लॉकडाऊन काळात दलितांवर हल्ले करण्यात आले. दलितांना न्याय मिळणार आहे की नाही. दलित भारताचे नागरिक आहेत की नाहीत. दलितांना संरक्षण देणार आहात का? असे प्रश्न त्यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारले आहेत. दलितांवरील वाढत्या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी रिपब्लीकन पक्ष ठिकठिकाणी आंदोलनं करत आहे.

 

First Published on: July 11, 2020 2:44 PM
Exit mobile version