बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करून दिली असती का?, रामदास कदमांचा सवाल

बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करून दिली असती का?, रामदास कदमांचा सवाल

राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. अनेक शिवसैनिक, पदाधिकारी आणि नेतेही शिंदे गटात सहभागी झाले आहेत. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करून दिली असती का?, असा सवाल शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी उपस्थित करत आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.

त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करून दिली असती का?

रामदास कदम यांनी प्रसार माध्यमांनी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मी आदित्य ठाकरेंना विचारतो की, बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी शिवसेना काँग्रेससोबत युती करुन दिली असती का? याचं उत्तर मला आदित्य ठाकरे यांनी द्यावं. पर्यावरण मंत्री असताना माझ्या खात्याचा सर्व कारभार आदित्य ठाकरेच चालवायचे, असा गौप्यस्फोटही रामदास कदम यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे माझे मित्र होऊ शकत नाहीत

मला आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत काही बोलायचं नाहीये. मात्र, महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जो काही संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी काही गोष्टींचा खुलासा होणं आवश्यक आहे. आदित्य ठाकरे माझे मित्र होऊ शकत नाहीत. कारण त्यांचं वय ३२ आहे. तर माझा राजकारणातील अनुभव ५२ वर्षांचा आहे. मातोश्री आमचं दैवत आहे. मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबाबत बोलायचं नाही असं ठरवलं आहे. पण अगदी नाईलाज होतो, तेव्हा काही खुलासे करावे लागतात. उद्धव ठाकरेंना माझ्याकडून मैत्रिदिनाच्या शुभेच्छा, असं रामदास कदम म्हणाले.

मी शिंदे आणि ठाकरेंना पुन्हा एकत्र आणण्यासाठी शिंदे गुवाहाटीला असताना प्रयत्न केला. मात्र तेव्हा ते झालं नाही. आता लढाई कोर्टात आहे. त्यामुळे आता ते एकत्र येतील की नाही यावर बोलणं योग्य नाही, असं सूचक वक्तव्यही रामदास कदम यांनी केलं.


हेही वाचा : राज्यात मविआचं सरकार असताना आपण किती दौरे केलेत, शंभुराज देसाईंचा आदित्य ठाकरेंना


 

First Published on: August 7, 2022 5:42 PM
Exit mobile version