Election Results : लोकसभेत मात्र ‘भाजप’ येणार – दानवे

Election Results : लोकसभेत मात्र ‘भाजप’ येणार – दानवे
देशातील 

तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांमधील विधानसभांचे निकाल समोर आले आहेत. या निकालानुसार छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. खरंतर या तिनही राज्यात आजवर भाजपचं वर्चस्व राहिलं आहे. मात्र, भाजपची सत्ता असलेल्या या तिनही राज्यांमध्ये काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे.


वाचा : तेलंगणामध्ये सर’कार’ तेजीत; महाआघाडी मागे

शिवसेना सोबत राहावी ही इच्छा

‘आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेने आमच्या सोबत रहावं ही आमची इच्छा आहे’, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. दुष्काळाला प्राधान्य न देता राममंदिर प्रश्नावर भर देण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेचा भाजपला तोटा होणार नसल्याचंही दानवे यांनी पत्रकारपरिषदेमध्ये स्पष्ट केलं होतं. पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष एकत्र आले तरी भाजपला निवडणुकांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळतील. राज्यात आणि केंद्रामध्ये पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येणार, असा विश्वासही दानवे यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर टीकाही केली होती. विकास कामांच्या जोरावर आम्ही निवडून येणार या भीतीने विरोधकांच्या पोटात गोळा आला असणार आणि त्यामुळेच ते लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीकाही दानवे यांनी केली होती.

First Published on: December 11, 2018 5:45 PM
Exit mobile version