रावसाहेब दानवेंची राहुल गांधींबाबत बोलताना जीभ घसरली, भर सभेत जहरी टीका

रावसाहेब दानवेंची राहुल गांधींबाबत बोलताना जीभ घसरली, भर सभेत जहरी टीका

रावसाहेब दानवेंची राहुल गांधींबाबत बोलताना जीभ घसरली, भर सभेत जहरी टीका

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी भर सभेत काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. भर सभेत जनतेशी संवाद साधताना दानवेंनी राहुल गांधींवर जहरी टीका केली आहे. दानवेंच्या वक्तव्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस असा वाद उफाळण्याची शक्यता आहे. राव साहेब दानवे यांची जन आशीर्वाद यात्रा बदनापूर या गावात पोहचली होती आणि त्या गावात दानवेंची सभा सुरु होती. या सभेत दानवेंनी राजकीय नेत्यांवर निशाणा साधत खासदार राहुल गांधी यांच्यावर जहरी टीका केली आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजप खासदार रावसाहेब दानवे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. या यात्रेदरम्यान बदनापूरमध्ये रावसाहेब दानवे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी दानवेंनी कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद साधला. या सभेत राहुल गांधींवर विखारी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत कौतुकाची सुमने उधळत असताना काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी कसे निरुपयोगी आहेत असं सांगताना विखारी शब्द वापरला आहे. या शब्दामुळे रावसाहेब दानवेंचा सर्व स्तरांतून निषेध करण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी बोलत असताना म्हटल आहे की, देवाला सोडलेला सांड जसा असतो तशाच स्वरुपाचे राहुल गांधी आहेत. ते कोणाच्या कामालाही येत नाहीत. राहुल गांधी कोणाचे काम करु शकत नाहीत. मात्र नरेंद्र मोदी हे देशामध्ये चांगलं काम करत आहेत. असं सांगताना राहुल गांधींवर टीका केली आहे. मात्र असं करत असताना रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधींवर खालच्या पातळीवर टीका केली आहे.

असं गलिच्छ राजकारण शिवसेनेचं

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी जन आशीर्वाद यात्रेपुर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं (balasaheb thackeray memorial) दर्शन घेणार असल्याचे जाहीर केलं होते. राणेंना दर्शन घेऊन देणार नाही असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला होता. मात्र नारायण राणेंना बाळासाहेबांच्या समाधीचं दर्शन घेण्यापासून रोखण्याचा इशारा द्यायला नको होता. असं गलिच्छ राजकारण फक्त शिवसेना करु शकते अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे.


हेही वाचा : गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी स्वत:च्या मनाचे शुद्धीकरण करा, नारायण राणेंचा शिवसेनेवर निशाणा


 

First Published on: August 20, 2021 3:20 PM
Exit mobile version