घरमहाराष्ट्रगोमुत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी स्वत:च्या मनाचे शुद्धीकरण करा, नारायण राणेंचा शिवसेनेवर...

गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी स्वत:च्या मनाचे शुद्धीकरण करा, नारायण राणेंचा शिवसेनेवर निशाणा

Subscribe

भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय सूक्ष्म व लघु-मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कातील स्मृतीस्थळाला भेट देत अभिवादन केले. या भेटीनंतर गुरुवारी सायंकाळी शिवसैनिकांनी या स्मृतीस्थळाचे गोमुत्राने शुद्धीकरण केले. यावरून नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत शिवसेनेवर जोरदार शाब्दिक हल्ला केला. “गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी स्वत:च्या मनाचे शुद्धीकरण करा” अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

आज झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलताना राणे म्हणाले की, “मी आपल्या पत्रकारीतेचा आदर करतो. महाराष्ट्रातील पत्रकारीतेचं वेगळं स्थान आहे. मी त्याला पत्रकारितेला व्यवसाय म्हणत नाही. पत्रकारांचं मार्गदर्शन आम्हालाही मिळावं, तुमच्या अनुभवाचा देशाच्या प्रगतीला फायदा व्हावा अशी अपेक्षा असते. मात्र सध्या पत्रकार मला देशातील प्रश्नांबद्दल विचारण्याऐवजी केवळ गोमूत्र आणि गोमूत्र या एकाच विषयाबद्दल सतत विचारणा करत आहेत. ह्या एकाच विषयासाठी आम्ही आलो आहोत का?… मला कोणासमोर नमस्कार करावासा वाटतो?… कोणासमोर विनम्र व्हावसं वाटत हा माझा प्रश्न आहे. गोमुत्र ज्याला शिंपडायचं त्याला शिंपडू द्या, गोमुत्र प्यायचं असेल तर पिऊ द्या, त्यात माझा काय संबंध?…मला का विचारयतायं?.. त्याला विचारा ना का शिंपडल?… काय दुषित झालं होते? एवढा जर स्मारकाबद्दल अभिमान असेल ना गोमुत्र शिंपडायला आलेल्यांनी  ते स्मारक जागतिक किर्तीचे करुन दाखवा.” अशा शब्दात त्यांनी शिवसैनिकांवर निशाणा साधला.

- Advertisement -

राणे पुढे बोलताना म्हणाले की, गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी स्वत:चे मन शुद्धीकरण करा. आणि मग कारभार करा. औषधात पैसे खाणारे हे सरकार… गोमुत्र आम्ही आमच्या धर्मात पवित्र मानतो… ते हातात घेण्याची पण त्यांची पात्रता नाही. हे कोण आहेत? आम्ही मानत नाही ह्यांना. ह्यांनी काय पावित्र्य सांभाळलेय़? औरंगाबाद, नागपूरला जे गुन्हे होताय. ते कोण आहेत. शिवसैनिक आहेत…. तो राठोड कोण आहे संत आहे का? अशी जहरी टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे.

“साहेब आशीर्वाद द्यायला तुम्ही हवे होते.”

शिवसेना प्रमुख बाळा साहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत राणे म्हणाले की, “शिवाजी पार्क समोरचं होत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर जाऊन नमस्कार केला, तिथे जाऊन एकचं वाक्य म्हणालो ते आजही तुम्हाला सांगतो. साहेब आशीर्वाद द्यायला तुम्ही हवे होते. साहेब मला आशीर्वाद द्या मी यशस्वी होऊ दे.”

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -