मुंबईत बलात्कार, तर कोल्हापुरात दंगल; सरकारवर निशाणा साधत अजित पवारांनी केला निषेध

मुंबईत बलात्कार, तर कोल्हापुरात दंगल; सरकारवर निशाणा साधत अजित पवारांनी केला निषेध

एकीकडे मुंबईत मंगळवारी (ता. 07 जून) रात्री शासकीय वसतीगृहात राहणाऱ्या एका मुलीवर त्याच वसतीगृहातील सुरक्षारक्षकाकडून बलात्कार करण्यात आला. त्यानंतर या सुरक्षारक्षकाने आत्महत्या केली. तर दुसरीकडे कोल्हापुरात आक्षेपार्ह पोस्टमुळे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरात अनुचित प्रकार टाळण्यासाठी इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. पण या प्रकरणांवरून विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष करण्यास सुरूवात केली आहे. राज्यात सततच्या घडणाऱ्या दंगली हे राज्य सरकारचे सर्वात मोठे अपयश असल्याचे विरोधकांकडून बोलण्यात येत आहे. तर या राज्यातील कायदा सुवव्यस्था राज्य सरकारला अबाधित ठेवता येत नसेल तर याचा करावा तितका निषेध कमी आहे, असे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – अशा घटनांमुळे महाराष्ट्राची प्रगती थांबेल; कोल्हापूर प्रकरणी अनिल परब यांची प्रतिक्रिया

अजित पवार यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधत मुंबई आणि कोल्हापुरातील घटनांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईतील घटनेवर भाष्य करत अजित पवार म्हणाले की, मुलींना, महिलांना आणि मुलांना फक्त मुंबईतच नाही तर राज्यातील कोणत्याही कानाकोपऱ्यात सुरक्षित वाटले पाहिजे. पण असे घडत नाहीये. या घटनांना पोलीस, राज्य सरकार जबाबदार आहेत. सरकार यामध्ये कठोर भूमिका घेताना दिसत नाही, असे ताशेरे अजित पवार यांनी ओढले आहेत.

तर मुंबईतील घटनेमधील आरोपी सुरक्षारक्षकाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, वास्तविक त्या व्यक्तीला गार्ड म्हणून कोणी ठेवला होता. त्याची माहिती घेतलेली होती का? कारण सांगताना असे सांगण्यात येत आहे की, त्याचे वडील पूर्वी तिथे काम करायला होते आणि म्हणून त्या आरोपीला देखील तिथे नोकरीसाठी ठेवण्यात आले. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी. तर या घटनेची वस्तुस्थिती, किती जणांनी हे कृत्य केले? याबाबत सखोल तपासणी करण्यात यावी. तसेच जर का मुलींच्या किंवा महिलांच्या सुरक्षिततेच्याबाबत सरकार निष्काळजी राहणार असेल सरकारचा करावा तितकी निषेध कमी आहे.

मुंबईत घडलेली घटना गृहीत धरून राज्यातील शासकीय वसतिगृहांची सुरक्षा व्यवस्था नीट आहे का? सीसीटीव्ही कॅमेरे सुरु आहेत का? याबाबतची तपासणी सरकारने करावी, असे यावेळी अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले. तर या प्रकरणात ज्या काही शंका निर्माण होत आहेत, त्याची खोलवर चौकशी करावी, असे अजित पवार म्हणाले आहेत. तसेच, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांशी मी बोललो असून या घटनेच्या मूळापर्यंत जाऊन या घटनेतील जबाबदार व्यक्तीचा छडा लावला पाहिजे, असे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.

यावेळी अजित पवार हे कोल्हापुरातील तणावाबाबत बोलताना म्हणाले की, कोल्हापूर हे शांतताप्रिय शहर असून येथे अशांतता निर्माम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा लवकरात लवकर छडा लावावा, असे ते म्हणाले. तसेच हा राडा, दंगली हाताळण्यासाठी पोलिसांना फ्री हँड द्यावा, त्यांच्या कामात राजकीय हस्तक्षेप करू नये. समाजकंटकांवर कारवाई करण्यास पोलिस सक्षम आहेत.

तर आक्षेपार्ह स्टेटस कोणी ठेवले, त्याची सखोल चौकशी व्हावी. ती व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षाची असली तरीही त्यात हस्तक्षेप न करता कठोर कावाई व्हावी, असे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचं समर्थन कसं कोणी करेल आणि ते का करावं? उगीचच त्या घटनेला वेगळं स्वरूप देऊ नका, असा सल्ला त्यांनी राजकीय नेत्यांना दिला आहे.

First Published on: June 7, 2023 4:15 PM
Exit mobile version