चॉकलेटचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलींवर बलात्कार; एकीचा मृत्यू

चॉकलेटचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलींवर बलात्कार; एकीचा मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून १२ वर्षीय मुलींवर बलात्कार केल्याचे उघड झाले असून यामध्ये एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या मुलीवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गणेश निकम (२२) याच्यासह एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

नेमके काय घडले?

पुण्यातील हिंजवडी परिसरात १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन मुली रविवारी दुपारी कासारसाई येथील मंदिरात खेळायला गेल्या होत्या. मंदिराजवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी गणेश निकम (२२) आणि त्याचा मित्र त्याठिकाणी आले. या दोन तरुणांनी मुलींना पाहून चॉकलेटचे आमिष दाखवत मंदिराच्या पाठीमागील घनदाट झाडीत घेऊन गेले आणि या दोन्ही मुलींवर बलात्कार केला. या दोन मुलांनी अल्पवयीन मुलींवर आळीपाळीने बलात्कार केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली आहे. या मुलींना धमकवण्यात देखील आले आहे. तसेच या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. यामुळे पीडित मुलींवर बलात्कार होऊन देखील त्या शांत होत्या.

उपचारा दरम्यान एकीचा मृत्यू

बुधवारी एका मुलीच्या पोटात दुखायला लागल्याने त्या मुलीला ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, असता हा प्रकार उघडकीस आला. यामध्ये प्रथम दाखल करण्यात आलेल्या मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून दुसऱ्या मुलीवर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे अधिक तपास करीत आहेत.

वाचा – बलात्काराच्या आरोपातून निर्दोष सुटका

वाचा – पिंपरीतील शाळेच्या समिती अध्यक्षावर बलात्काराचा आरोप

वाचा – सावत्र भावाच्या पत्नीवर बलात्कार; आरोपीला १० वर्षांची शिक्षा

First Published on: September 20, 2018 9:57 AM
Exit mobile version