अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

दोन हजार रुपयांसाठी प्रियकराने उचलले भयानक पाऊल

एका विकृताने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने त्यातून ती गरोदर राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या विकृत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.परिसरातील कैरे शिवाजीनगर येथील ही १३ वर्षीय मुलगी सावत्र वडील आणि मोठ्या भावाबरोबर राहते. आईने पती निधनानंतर दुसरे लग्न केले. दुर्दैवाने आईचेही निधन झाल्याने घरात अडचण नको म्हणून या मुलीने आठवी इयत्तेतून शिक्षण सोडले. मुलीचे वडील कंत्राटी कामगार असून, सकाळी ७ वाजता बाहेर पडल्यानंतर ते रात्री उशिरा घरी परतात. त्यांचा त्याच भागात राहणारा मित्र प्रभाकर महादू रायकर ऊर्फ काळूराम (३५) याचे तिच्या घरी नेहमी जाणे-येणे असे. दीड महिन्यांपूर्वी घरातील कामे आटपून ती घराजवळील डोंगराच्या झर्‍यावर कपडे धुण्यासाठी गेली असता काळूरामने तेथे जात तिला जबरदस्तीने झाडीत नेऊन बलात्कार केला. जाताना हा प्रकार कुणाला सांगितला तर ठार मारण्याची धमकी त्याने दिली.

भेदरलेल्या अवस्थेत ही मुलगी घरी आली, मात्र तिने घडलेला प्रकार घरात सांगितला नाही. अलीकडे उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने वडिलांनी तिला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय तपासणीत तिला दिवस गेल्याचे समोर आल्याने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. सुरूवातीला अनोळखी इसम असल्याचे सांगणार्‍या या दुर्दैवी मुलीला विश्वासात घेतल्यानंतर तिने काळूरामचे नाव सांगितले. येथील पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुजाता तानवडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी काळूरामच्या मुसक्या आवळल्या. न्यायालयाने त्याला 16 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

First Published on: October 15, 2019 1:09 AM
Exit mobile version