चौकशी अधिकारी छळ करत असल्याचा रश्मी शुक्लांचा आरोप; हायकोर्टात याचिका

चौकशी अधिकारी छळ करत असल्याचा रश्मी शुक्लांचा आरोप; हायकोर्टात याचिका

मुंबई पोलिसांनी वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलिसांच्या पोस्टिंगबाबत गोपनीय कागदपत्रं लीक केल्या प्रकरणी समन्स पाठवलं होतं. दरम्यान, या प्रकरणी रश्मी शुक्ला या हैदराबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. समन्स पाठवून मानसिक छळ न करण्याच्या सूचना पोलिसांना द्याव्या, अशी विनंती रश्मी शुक्ला यांनी उच्च न्यायालयाला केली आहे. रश्मी शुक्ला यांच्या याचिकेवर ६ मे रोजी म्हणजेच उद्या सुनावणी होणार आहे. रश्मी शुक्ला या केंद्रीय राखीव पोलीस दलात अप्पर पोलीस महासंचालक म्हणून हैदराबाद येथे कार्यरत आहेत.

रश्मी शुक्ला यांनी २९ एप्रिलला याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ६ मे रोजी हैदराबाद उच्च न्यायालयात सुनवाणी होणार आहे. रश्मी शुक्ला यांनी दाखल केलेल्या याचिकेत चौकशी अधिकारी छळ करत असल्याचा आरोप केला आहे. याचिकेत राज्य सरकार, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त आणि एसपी सायबर यांना प्रतिवादी करण्यात आलं आहे.

पोलिसांच्या पोस्टिंगबाबत गोपनीय कागदपत्रं लीक केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी समन्स पाठवलं होतं. मात्र, त्या कोरोनाचं कारण देत चौकशीला हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा समन्स पाठवला होता. मुंबई पोलिसांनी आज चौकशीसाठी बोलावले होते.

चौकशीची घाई असल्यास प्रश्न पाठवा, उत्तरं देते – रश्मी शुक्ला

रश्मीशुक्ला या जेव्हा SID मध्ये अधिकारी म्हणून होत्या तेव्हा त्यांनी काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी बुधवार 28 एप्रिल रोजी सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास शुक्लांना समन्समध्ये सांगण्यात आलं होतं. रश्मी शुक्ला यांनी सायबर पोलिसांना सध्या चौकशीला येऊ शकणार नसल्याचं कळवलं आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता हजेरी शक्य नसल्याचं उत्तर रश्मी शुक्ला यांनी सायबर पोलिसांनी दिलेल्या समन्सला दिलं. चौकशीची खूपच घाई असेल, तर प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरे देईन, असं रश्मी शुक्ला यांनी सायबर सेलला सांगितलं होतं.

 

First Published on: May 3, 2021 10:49 AM
Exit mobile version