घाबरु नका! रेशनसह खाण्यापिण्याच्या सामानांची दुकाने, मेडिकल उघडी राहतील

घाबरु नका! रेशनसह खाण्यापिण्याच्या सामानांची दुकाने, मेडिकल उघडी राहतील

रेशनसह खाण्यापिण्याच्या सामानांची दुकाने, मेडिकल उघडी राहतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित केले. करोना विषाणूचा प्रसार थांबवायचा असेल तर केवळ एकच मार्ग आहे. तो म्हणजे सोशल डिस्टसिंग. त्यामुळे आज रात्री १२ वाजल्यापासून संपूर्ण देशात पुर्णपणे लॉकडाऊन होणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. करोना संक्रमणाची सायकल तोडण्यासाठी २१ दिवस लागतात. जर हे २१ दिवस आपण काळजी नाही घेतली तर कित्येक परिवार कायमचे उध्वस्त होऊ शकतात. त्यामुळे हा २१ दिवसांचा लॉकडाऊन आपण जाहीर करत आहोत. मात्र, या दरम्यान महाराष्ट्रामध्ये रेशन, खाण्यापिण्याच्या सामानांची दुकाने आणि मेडिकल उघडी राहतील त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

आज रात्री १२ नंतर देशात २१ दिवसासाठी लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानंतर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावर लागलीच राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लोकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. घाबरू नका सर्व सामान मिळेल अशाप्रकारचे ट्वीट अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी करून जनतेला धीर दिला आहे.


हेही  वाचा – Big Breaking: आज रात्री १२ वाजल्यापासून संपुर्ण देशात लॉकडाऊन – पंतप्रधान मोदी


First Published on: March 24, 2020 11:26 PM
Exit mobile version