… त्यामुळे भाजपचे डोळे उघडले, पहिल्याच पत्रकार परिषदेतून धंगेकरांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

… त्यामुळे भाजपचे डोळे उघडले, पहिल्याच पत्रकार परिषदेतून धंगेकरांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

रवींद्र धंगेकरांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमध्ये नाराजी

मागील महिन्यात कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक पार पडली. यावेळी कसब्यात महाविकास आघाडीने भाजपचा पराभव केला. त्यामुळे महाविकास आघाडीचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला. मात्र, विजय झाल्यानंतर आज रवींद्र धंगेकर यांनी पहिल्यांदाच पुण्यात पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मागील अनेक वर्षांपासून पुणे शहरातील नागरिकांना मिळकत करात सवलत मिळावी, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो. या प्रयत्नांना यश आलं आहे. काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन त्यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. त्यामध्ये शहरातील मिळकत करात 40 टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे, असे आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत शिंदे-फडणवीस सरकारला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे त्यांचे डोळे उघडले असून आता ते निर्णय घ्यायला लागले आहेत. मला मत दिलं आणि निवडून आणलं. तसेच जनतेची सेवा करण्याची संधी दिली, असं म्हणत धंगेकर यांनी जनतेचे आभार मानले आहे.

पुणे शहरात जवळपास 10 लाख मिळकती आहेत. त्या सर्व मिळकतधारकांना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांच्याकडून महापालिका प्रशासन मिळकत कर वसुली करीत होती. त्यामुळे मिळकत करात सवलत मिळाली पाहिजे, अशी मागणी महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून आजपर्यंत मांडली. त्याचप्रमाणे आज आमदार म्हणून विधिमंडळात हीच मागणी केली, असं धंगेकर म्हणाले.


हेही वाचा : मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न, योगेश कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका


 

First Published on: March 18, 2023 7:43 PM
Exit mobile version