“आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली…”; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

“आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली…”; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे यांनी अखेर या बंडखोरीमागच्या कहाणीचा उलगडा केलाय.

नॉट रिचेबल असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रीय दिली आहे. आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे”, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रीया दिली. (reaction of eknath shinde who is not reachable on twitter)

नेमके काय लिहिलंय प्रतिक्रीयेत  

“आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही”, असे एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमध्ये आहेत. त्यांच्यासोबत काही समर्थक आमदार असल्याने महाविकासआघाडी सरकार धोक्यात असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. दरम्यान, याआधी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीन प्रस्ताव दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

एकनाथ शिंदे यांनी २ वाजून ३२ मिनिटांनी यांनी हे ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या नेतृत्त्वाचे नाव घेतले. मात्र उद्धव ठाकरे यांचा उल्लेखही एकनाथ शिंदे यांच्या ट्वीटमध्ये नसल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. अवघ्या काही मिनिटांच्या आत त्यांचं हे ट्वीट व्हायरल झाले आहे.

तीन प्रस्ताव कोणते

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार हे तीन प्रस्ताव एकनाथ शिंदेंकडून देण्यात आले होते.


हेही वाचा – मुख्यमंत्री कोणाला बनवायचे हे सेना ठरवेल, एकनाथ शिंदेबाबत चर्चाही नाही – शरद पवार

First Published on: June 21, 2022 3:01 PM
Exit mobile version