तिवरे धरण फुटीचा अहवाल प्राप्त; सरकारकडून छाननी सुरु

तिवरे धरण फुटीचा अहवाल प्राप्त; सरकारकडून छाननी सुरु

तिवरे धरण फुटीचा अहवाल प्राप्त झाला आहे.

रत्नागिरी येथील तिवरे धरण फुटीप्रकरणी एसआयटी चौकशीचा अहवाल अखेर सरकारकडे प्राप्त झाला असल्याची माहिती शुक्रवारी विधानसभेत समोर आली आहे. सरकारकडून या अहवालाची छाननी सुरु असल्याची माहिती जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात समोर आलेली आहे. तिवरे धरण फुटीमुळे ग्रामस्थांस्थांच्या झालेल्या मृत्यू संदर्भात आमदार निलेश लंके, अशोक पवार यांच्यासह अनेक आमदारांनी शुक्रवारी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी दिलेल्या लेखी उत्तरात वरील बाब समोर आली आहे.


हेही वाचा – आदित्य ठाकरे विधानपरिषदेत आमदारांसमोर म्हणाले, ‘आपणच खरे कचरेवाले’!

तिवरे धरण फुटी धरण प्रकरणाबाबत दिलेल्या लेखी उत्तरात शंकरराव गडाख नमूद करतात की, तिवरे धरणफुटी दुर्घटनेत एकूण २२ व्यक्ती मृत्युमुखी पडले आहेत. यापैकी २१ मृतदेह प्राप्त झाले आहेत. तसेच तिवरे भेंदवाडी गावातील नदी किनारी असणारे १५ घरे, १३ गावे आणि १ पोल्ट्री वाहून गेली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. तर या दुर्घटनेत २१ मृत व्यक्तीपैकी १८ मृतांच्या वारसात प्रत्येकी ६ लाख याप्रमाणे एकूण १०८.०० लाख मदत करण्यात आली आहे. उर्वारित ३ मृतांपैकी १ मृताचे वारस प्रमाणपत्र व २ मृतांचे अज्ञान पालनकर्ता प्रमाणपत्र न्यायालयाकडून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. तर महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून २.६० लाख इतकी रक्कम २६ कुटुंबाना प्रत्येकी १० हजार प्रमाणे रोख मदत अदा करण्यात आली असल्याचे देखील त्यांनी यावेळी लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे.

 

First Published on: February 28, 2020 7:22 PM
Exit mobile version