पद्मश्री शीतल महाजन यांचा विक्रम; स्काय डायव्हिंग करत 5 हजार उंचीवरून उडी

पद्मश्री शीतल महाजन यांचा विक्रम; स्काय डायव्हिंग करत 5 हजार उंचीवरून उडी

Sheetal Mahajan new National Record

पुण्याच्या पद्मश्री शीतल महाजन- राणे यांनी पाॅवर हॅंग ग्लायडर मधून स्काय डायव्हिंग करुन नवीन राष्ट्रीय विक्रम रचला आहे. त्यांनी हा विक्रम 5 हजार उंचावरुन उडी मारत नोंदवला आहे. हरियाणामधील पिंजर विमानतळावर एरो क्लब ऑफ इंडिया आयोजित नॅशनल माॅडलिंग फेलोशिप या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी त्यांनी हा विक्रम केला आहे. यावेळी पाॅवर हॅंग ग्लाईडरचे पायलट हे उत्तर प्रदेशचे गोंडा जिल्ह्याचे खासदार कीर्तीवर्धन सिंग होते. Record of Padma Shri Shital Mahajan Jump from a height of 5000 by sky diving

कीर्तीवर्धन हे भारतातील पहिले खासदार

पायलट कीर्तीवर्धन सिंग हे पहिले भारतीय खासदार ठरले आहेत ज्यांनी अशा प्रकारची प‌ॅराशुटची उडी पावर हॅंग्लाइडिंग मधून यशस्वीरित्या पार पाडली. भारतात सध्या दोनच विद्यमान खासदार हवाई पायलट आहेत. त्यातील एक राजीव प्रताप रुडी सारण (बिहार) आणि दुसरे कीर्तीवर्धन सिंग ( उत्तरप्रदेश) यांचा समावेश आहे.

खासदार कीर्तीवर्धन सिंह हे भारतातील पहिले खासदार आहेत जे पावर हॅंग ग्लाइडरचे पायलट आहेत. खासदार राजीव प्रताप रुडी हे इंडिगो या विमानाचे कमर्शिअल पायलट आहेत आणि विद्यमान खासदारही आहेत.

राष्ट्रीय विक्रम केल्याने आनंदी

शीतल महाजन यांनी राष्ट्रीय विक्रम आपल्या नावे केल्यावर म्हटले की, पा‌ॅवर हॅंग ग्लाईडर मधून स्काय डायव्हिंग करणे माझ्यासाठी नवीनच प्रकार होता. यामध्ये नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करु शकले याचा मला आनंद आहे. माझ्यासोबत विद्यमान खासदार कीर्तीवर्धन सिंह हे पायलट होते. त्यांनी प्रोत्साहित करण्यासोबतच मला या मोहिमेत यशस्वी साथ दिली.

( हेही वाचा: फोटो : शरयूतीरी आरती केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट )

नऊवारीत रचला होता विक्रम

याआधी शितल महाजन यांनी नऊवारी साडी आणि मराठमोठा साज करत हडपसर येखील ग्लायडिंग सेंटर येथे पॅरामोटरच्या सहाय्याने सहा हजरा फुटांवरुन पॅराजम्पिंग करुन तिरंग्याला सलामी दिली. अशाप्रकारे नऊवारीत प‌‌‌ॅरमोटारमधून पॅराजम्प करणारी त्या पहिल्याच भारतीय महिला ठरल्या.

शीतल या बहिणाबाई चौधरी यांच्या त्या पणती आहेत. 2004 मध्ये कोणताीह पूर्वानुभव नसताना शीतल महाजन यांनी उणे 37 अंश तापमानात प‌ॅराशूटच्या साहाय्याने 3 हजार फुटांवरुन उडी मारली होती. त्यानंतर 2006 मध्ये फ्री फाॅल आणि प‌‌ॅराशूटच्या साह्याने दक्षिण ध्रुवावर उडी मारणाऱ्या शीतल या जगातली एकमेव महिला ठरल्या. क्रीडा व साहस क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.

First Published on: April 10, 2023 8:17 AM
Exit mobile version