CoronaVirus: रिलायन्स कंपनी कर्मचाऱ्यांना पगार दुप्पट देणार!

CoronaVirus: रिलायन्स कंपनी कर्मचाऱ्यांना पगार दुप्पट देणार!

Mukesh Ambani Plan: मुकेश अंबानींच्या संपत्तीची कशी होणार वाटणी? वॉल्टन मॉडेल विचाराधीन

करोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ज्यांचे वेतन दरमहा ३० हजार रुपयांपेक्षा कमी आहेत त्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीतील ३० हजार रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुप्पट वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. करोना व्हायरसशी लढण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपयायोजनांपैकी हा एक भाग असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

काम बंद असली तरी संपूर्ण वेतन देणार

कोविड-१९ या व्हायरसशी लढण्याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या रिलायन्स फाऊंडेशन, रिलायन्स रिटेल, जिओ, रिलायन्स लाइफ सायन्सेस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स परिवारातील सर्व सहा लाख कर्मचारी सदस्यांना सामाविष्ट करून घेण्यात आलं आहे. आर्थिक गरज भागवण्यासाठी दरमहा ३० हजार रुपयांपेक्षा कमी वेतन घेणाऱ्या समूहातील कर्मचाऱ्यांना दुप्पट वेतन देणार आहे. करोनामुळे कंपन्यांचे काम बंद झाले असेल तरी देखील ठरविल्याप्रमाणे कंपनी संपूर्ण वेतन देणार आहे. रिलायन्स काही कर्मचारी हे वर्क फ्रॉम होम देखील करत आहे.

सेव्हन हिल्स रुग्णालयात स्वतंत्र १०० बेड्सची सुविधा

तसंच करोनाबाधित रुग्णांच्या मदतीसाठी रिलायन्सने मुंबईत विशेष रुग्णालय सुरू केलं आहे. तसंच अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात स्वतंत्र १०० बेड्सची सुविधा केली असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. तसंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच कोटींची देणनी रिलायन्सने दिला आहे.


हेही वाचा – रेल्वे तिकिट रद्द करू नका, तुमचेच पैसे कापले जातील – IRCTC


 

First Published on: March 26, 2020 12:00 PM
Exit mobile version