शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी ठाकरे गटाला दिलासा, सातही शिवसैनिकांना जमीन मंजूर

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी ठाकरे गटाला दिलासा, सातही शिवसैनिकांना जमीन मंजूर

मुंबई : शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी ठाकरे गटाच्या युवासेनेच्या साईनाथ दुर्गे यांच्यासह सहा जणांना अटक केली होती. या सातही जणांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे दहा दिवसात म्हणजे उद्या संशयितांची जेलमधून मुक्तता होणार आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. साईनाथ दुर्गे हे ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत.

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा कथित व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या सात कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. यात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि ठाकरे गटाच्या युवासेनाप्रमुख साईनाथ दुर्गे यांचा देखील समावेश होता. त्यांची आज न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. बोरीवली न्यायालयाने साईनाथ दुर्गे यांच्यासह अशोक मिश्रा, मानस अनंत कुवर, विनायक डायरे, रविंद्र चौधरी, अक्षय धनधर आणि यशवंत विचले या सहा संशयितांना जामीन मंजूर केला आहे. ज्येष्ठ वकील राजेश मोरे, ज्येष्ठ वकील अनिल पार्टे यांना वकील प्राची पार्टे, वकील मेराज शेख यांनी या प्रकरणी संशयितांच्या बाजूने बोरीवली न्यायालयात युक्तिवाद केला.

दरम्यान, न्यायालयाने या सातही संशयितांना जामीन मंजूर करताना काही अटी-शर्ती पालन करण्यात सांगितले आहे. या अटी-शर्ती पाळल्या नाहीत तर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. तसेच संशयितांना दर सोमवारी दहिसर पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागणार आहे. याशिवाय सोशल मीडिया न वापरणे आणि मुंबई बाहेर न जाण्याच्या अटींवर संशयितांना 20 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

साईनाथ आमचा वाघ – आदित्य ठाकरे
साईनाथ दुर्गे याला शिलम म्हात्रे प्रकरणात पोलीस कोठडी सुनावली तेव्हा आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या दादरच्या घरी जावून कुटुंबियांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी साईनाथ आमचा वाघ असल्याचे वक्तव्य केले होते. आदित्य म्हणाले की, साईनाथ आमचा वाघ, तो अन्यायाच्या विरुद्ध लढतो आहे. या राज्यात मोगलाई आल्यासारखी धरपकड सुरू आहे. तरुणांवर खोटे आरोप लावून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नाविरुद्ध आम्ही लढू आणि यापुढेही लढत राहू. अशा मोगलाईला आम्ही घाबरत नाही. या महाराष्ट्रात आम्ही अन्यायाविरुद्धल लढत राहू, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले होते.

First Published on: March 23, 2023 10:48 PM
Exit mobile version