राकेश झुनझुनवालांच्या ट्रस्टची जबाबदारी उद्योजक राधाकिशन दमानींकडे

राकेश झुनझुनवालांच्या ट्रस्टची जबाबदारी उद्योजक राधाकिशन दमानींकडे

मुंबई – देशातील आघाडीच्या गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची ट्रस्टचे काम त्यांचे विश्वासू मित्र आणि उद्योजक राधाकिशन दमानी हाताळणार असल्याचे समजते आहे. त्यांनी राकेश झुनझुनवाला ट्रस्टच्या मुख्य विश्वस्तपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांना कल्पराज धरणशी आणि अमल पारीख हे अन्य दोन विश्वस्त मदत करणार आहेत.  हे दोघेही झुनझुनवाला यांचे अत्यंत विश्वासार्ह सोबती आहेत.

झुनझुनवाला यांची कंपनी रेयर एंटरप्रायझेस च्या व्यवस्थापनाची जबाबदारी राकेश झुनझुनवाला यांचे दोन सहकारी उत्पल सेठ आणि अमित गोएला हे यांच्याकडेच देण्यात आली आहे. उत्पल सेठ झुनझुनवाला यांना गुंतवणुकीसाठी मदत करत होते आणि गेल्या काही वर्षांपासून प्रामुख्याने प्रायव्हेट इक्विटी इनव्हेस्टमेंटवर लक्ष केंद्रित करत होते. अमित गोएला हे ट्रेडिंगच्या बाबतीत झुनझुनवालांचा राईड हँड मानले जात होते. ते स्वतंत्रपणे कंपनीचे ट्रेडिंग बुक सांभाळत होते.

राकेश झुनझुनवालांचे १४ ऑगस्टली निधन झाले. त्यांनी आपल्या पत्नी आणि तीन मुलांसाठी लिस्टेड आणि अनलिस्टेड कंपन्यांमधील गुंतवणूकीसह अब्जावधींची मालमत्ता त्यांनी मागे ठेवली आहे. त्याचे मृत्युपत्र सागर असोसिएट्सचे माजी व्यवस्थापकीय भागीदार बर्गेस देसाई यांनी तयार केले आहे. फोर्ब्सनुसार झुनझुनवाला हे भारतातील ४८ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यांच्या एकूण संपत्तीचे मूल्य ५.८ अब्ज डॉलर आहे. सध्याच्या किंमतीनुसार त्यांच्या लिस्टेड होल्डिंग्सची किंमत ३० हजार कोटी रुपये आहे.

First Published on: August 22, 2022 8:28 PM
Exit mobile version