Coronavirus: उद्यापासून सर्वसामान्यांना लोकल प्रवास बंद

Coronavirus: उद्यापासून सर्वसामान्यांना लोकल प्रवास बंद

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या सकाळी ६ वाजल्यापासून मंबईच्या लोकलमधून सर्वसामान्य लोकांना प्रवास करता येणार नसल्याची माहिती विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये ज्यांचा समावेश होतो त्यांनांच प्रवास करता येणार आहे. तसेच ज्यांना वैद्यकीय उपचाराची गरज आहे त्यांनाच प्रवास करता येणार आहे. मात्र, ओळखपत्र पाहूनच लोकलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे स्थानकावर विशेष पथक असणार आहे. या पथकामध्ये रेल्वे पोलिस, शहर पोलिस, वैद्यकीय अधिकारी आणि महसुल अधिकारी यांचा समावेश असणार आहे.

मुंबई महानगर परिसरातील मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर असलेल्या लोकलची गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच वैद्यकीय कारणास्तव प्रवास करणारे लोक वगळता, सामान्य प्रवाशांच्या प्रवासास बंदी घालण्यात आली आहे. कोकण विभागाचे विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी हे आदेश दिले आहे.

महानगरपालिका आणि नगरपालिकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना कळण्यासाठी या आदेशाची प्रसिद्धी मोहिम राबवण्याच्या सुचनासुद्धा देण्यात आल्या आहेत. ज्यांचा अत्यावश्यक सेवेशी संबंध नाही. अशा लोकांनी रेल्वेने अनावश्यक प्रवास टाळावा त्यांना रेल्वे स्थानकांवर प्रवेश दिला जाणार नाही. अत्यावश्यक सेवेतील अघिकारी, कर्मचारी यांची शासकीय ओळखपत्र, नियुक्ती आदेशाच्या आधारे खात्री करून प्रवास करता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी वगळता केवळ वैद्यकीय सेवेची तात्काळ आवश्यकता असणाऱ्या व्यक्तींनाच रेल्वे स्थानकावर प्रवेश देण्यात येणार असल्याचे कोंकण रेल्वेचे विभागीय आयुक्त शिवादी दौंड यांनी सांगितले आहे.

 

 

First Published on: March 21, 2020 10:43 PM
Exit mobile version