आता मॅकडोनाल्ड, बर्गर किंग आणि केएफसीवर एफडीएची नजर

आता मॅकडोनाल्ड, बर्गर किंग आणि केएफसीवर एफडीएची नजर

मॅकडोनाल्ड, बर्गर किंग आणि केएफसीवर एफडीएची नजर

मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला चमचमीत खावेसे वाटते. त्यातच बर्गर किंग, मॅकडोनाल्ड, केएफसीसारख्या ठिकाणी लोकांची फार गर्दी पाहायला मिळते. पण, या ठिकाणच्या जेवणातील मेलेल्या पाल किंवा झुरळ आढळलेल्या व्हिडिओमुळे इथल्या जेवणावरही साशंकता उपस्थित केले जाते. पण, आता तसे होणार नाही. कारण, एफडीएकडून आता अशा ठिकाणांच्या फूडवर लक्ष ठेवण्यात येणार असून विविध ८३ फूड कॉर्नर्सना अन्नाबाबतच्या नियमावलींची चेकलिस्ट दिली जाणार आहे. याबाबत येत्या दोन महिन्यात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत हे पाऊल उचलण्यात आले आहे. बर्गर किंग, मॅकडोनाल्ड्स, फासोस, वर्क एक्स्प्रेस अशा विविध फूड कॉर्नर्सना ही चेकलिस्ट देण्यात आली आहे. एफडीएकडून दिलेल्या चेकलिस्टनुसारच या संस्थांना अन्नाची सुरक्षा तसेच स्वच्छता ठेवावी लागणार आहे.

काय आहे चेकलिस्टमध्ये?

चेकलिस्टमध्ये फूड सेफ्टी अँड स्टँडर्स ऑथोरिटी इंडियाचा परवाना, अन्न तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, फूड कॉर्नरच्या आतील स्ट्रक्चर्स, भिंतींना देण्यात आलेला रंग, किचनमधील स्वच्छता, सीलिंग, मांसाहारासाठी वापरण्यात येणाऱ्या मसाल्यापासून ते कुठल्या प्रकारचा मांसाहार इत्यादी सर्व काही असणार आहे. या चेकलिस्टची योग्यप्रकारे अंमलबजावणी झाली नाही तर संबंधिक व्यावसायिकाचा परवानाही रद्द होऊ शकणार आहे.

याआधी एफडीएकडून ऑनलाईन फूड उपलब्ध करुन देणाऱ्या कंपन्यानाही नियमावली बनवून दिली होती. एफडीएकडून वारंवार केल्या जाणाऱ्या कारवाईंमधून अन्न पुरवणाऱ्या संस्थांवर एफडीएची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.


वाचा – ऑनलाईन ‘Food Apps’वर एफडीएची नजर!

वाचा – भेसळ रोखण्यासाठी एफडीएची मोहीम


 

First Published on: May 31, 2019 11:42 AM
Exit mobile version