तुमच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही; वडिलांच्या आठवणीने रितेश झाला भावुक

तुमच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही; वडिलांच्या आठवणीने रितेश झाला भावुक

तुमच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही; वडिलांच्या आठवणीने रितेश झाला भावुक

काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांची आज (बुधवार,२६मे) ७६ वी जयंती आहे. वडीलांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता रितेश देशमुखने जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तुमच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही असे रितेशने म्हटले आहे. रितेश देशमुखचे त्याच्या वडीलांसोबत खुप चांगले घट्ट मैत्रीचेही नाते होते. मागील वर्षी ७५ व्या वाढदिवसानिमित्त भावनिक व्हिडओ शेअर केला होता तर आता बालपणीचा फोटो शेअर करत ती वेळ पुन्हा यावी अशी भावनाही रितेशने आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख हे जनतेच्या मनावर राज्य करणारे होते. त्यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी २०१२ मध्ये कर्करोगाच्या आजारामुळे निधन झाले. आज त्यांची ७६ वी जयंती आहे. जयंतीच्यानिमित्ताने रितेश देशमुख याने आपल्या वडीलांसोबतचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रितेश देशमुख आपल्या वडिलांशेजारी बसला आहे. रितेशने सफेद रंगाचा शर्ट आणि पॅन्ट असा पेहराव केला आहे. हा फोटो शेअर करत रितेश देशमुख याने लिहिले आहे की, “तुमची आठवण आल्याशिवास एकही दिवस जात नाही. परंतु आठवण आल्यावर एक वेदना जाणवते ती कधीही जात नाही” वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा! तुमची नेहमी आठवण येते अशी पोस्ट सोशल मीडिया अकाऊंटवर रितेश देशमुख यांने लिहिली आहे.

तसेच रितेश देशमुख याची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया देशमुखने देखील एक फोटो पोस्ट करत सासरे विलासराव देशमुख यांच्याबाबत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. जेनेलियाने लग्नाच्या वेळी काढलेला एक फोटो शेअर केला आहे. तसेच म्हटले आहे की, प्रिय बाबा, जेव्हा एखादी सून आपल्या सासरी जाते तेव्हा तिच्या मनात भीती असते की कुटुंबातील सगळे तिला स्विकारतील की नाही… परंतु तुम्ही विश्वास दिला की कुटुंब हे केवळ रक्ताच्या नात्याचे नसते…मला तुमच्या कुटुंबाचा भाग व्हायले होते… ही मिठी फक्त सासऱ्यांची नसून एका वडिलांची आहे म्हणून माझ्या वडीलांना मी सुरक्षित असल्याचे वाटत आणि चांगल्या कुटुंबात पाठवल्याचे समाधान वाटते. अशा आशयाची पोस्ट अभिनेत्री जेनेलिया देशमुखने शेअर केली आहे.

First Published on: May 26, 2021 2:41 PM
Exit mobile version